MS Dhoni Birthday : धोनीच्या पहिल्या प्रेयसीचा मृत्यू कसा झाला?

MS Dhoni Birthday : धोनीच्या पहिल्या प्रेयसीचा मृत्यू कसा झाला?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी 7 जुलै रोजी त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे, जो कॅप्टन कूलच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने विक्रमी पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

क्रिकेट जगतात धोनीचा दबदबा आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला शिखरावर नेले. 2007 साली टी-20 विश्वचषक, 2011 साली वनडे विश्वचषक आणि 2013 साली चॅम्पियन ट्रॉफी जिंकून त्याने भारतीय संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात मोठी भूमिका बजावली. तो भारतीय इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. पण वैयक्तिक आयुष्यात त्याने अनेक चढउतार पाहिले आहेत. मात्र त्यांना धोनीने कधीही आपली कमजोरी बनू दिली नाही. चला जाणून घेऊया मिस्टर कूल धोनीची अधुरी प्रेमकहाणी… (MS Dhoni Birthday)

धोनी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी माहिती देतो. सध्या तो त्याची पत्नी साक्षी रावत-सिंह आणि मुलगी जीवासोबत आनंदी जीवन जगत आहे, परंतु अनेकांना अजूनही धोनीच्या आयुष्यातील काही भाग माहित नाही. वास्तविक, साक्षीशी लग्न करण्यापूर्वी धोनीच्या आयुष्यात एक मुलगी होती, जिच्यावर माही खूप प्रेम करत होता, पण एका दुर्घटनेने दोघांना वेगळे केले. धोनीच्या वैयक्तिक आयुष्यावर बनलेल्या 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातही या गोष्टीचा उल्लेख आहे. 2016 मध्ये आलेल्या या बॉलिवूडपटानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयीचा खुलासा समोर आल्याने धोनीचे चाहते देखील स्वतःला दुःखी होण्यापासून रोखू शकले नाहीत. (MS Dhoni Birthday)

धोनीशी संबंधित सर्व गोष्टी या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आल्या होत्या. या चित्रपटात धोनीच्या पहिल्या प्रेयसीचा देखील उल्लेख असून दोघांच्या आयुष्याशी संबंधित अनेक पैलू उलगडण्यात आले. चित्रपटातील धोनीच्या अधु-या प्रेमकथेची सर्वाधिक चर्चा झाली होती.

प्रेम ही अशी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही तरुण्यात प्रदार्पण करता तेव्हा तुम्ही आपोआपच कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडतात. धोनीच्या बाबतीतही तेच झाले. मित्रांच्या माहितीनुसार, जेव्हा धोनी 20-21 वर्षांचा असेल तेव्हा तो प्रियंका झा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. धोनी या नात्याबद्दल इतका गंभीर होता की त्याने प्रियंकासोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहिले होते. 2002 मध्ये धोनी भारतीय क्रिकेट संघात स्वत:ची जागा पक्की करण्यासाठी धडपडत होता. याच दरम्यान, त्याची प्रियंका झा नावाच्या तरुणीशी ओळख झाली. हळूहळू ओळखीचे रुपांतर घट्ट मैत्रीत झाले. त्यानंतर हे जोडपे एकमेकांच्या अधिक जवळ आले. धोनी-प्रियंका हे दोघे एकमेकांच्या न कळत प्रेमात पडले होते.

याच दरम्यान 2003-04 मध्ये झिम्बाब्वे आणि केनिया दौर्‍यासाठी धोनीची भारतीय 'अ' संघात निवड झाली. धोनीने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झिम्बाब्वे इलेव्हन विरुद्ध 7 झेल, 4 स्टंपिंग करत यष्टिरक्षक म्हणून आपले कौशल्य दाखवले. त्रिकोणी स्पर्धेत केनिया, भारत अ आणि पाकिस्तान अ यांचा समावेश होता, ज्यामध्ये धोनीने पाकिस्तानच्या 223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झुंझार अर्धशतक झळकावले आणि भारताला विजय मिळवून दिला. आपली कामगिरी आणखी चमकदर करत त्याने त्याच स्पर्धेत 120 आणि 119 धावा करत दोन शतके ठोकली. धोनीने 7 सामन्यात 72.40 च्या सरासरीने एकूण 362 धावा कुटल्या. या मालिकेतील त्याच्या कामगिरीने तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीचे लक्ष वेधून घेतले. तथापि, भारत 'अ' संघाचे प्रशिक्षक संदीप पाटील यांनी धोनीची भारतीय क्रिकेट संघात यष्टिरक्षक आणि फलंदाज म्हणून स्थानासाठी शिफारस केली.

मात्र, भारतीय संघात त्याची निवड होण्यापूर्वीच धोनीच्या आयुष्यात एक मोठे वादळ आले ज्याने सर्व धोनीला मोठा धक्का दिला. हा दौरा संपवून जेव्हा धोनी भारतात परतला. त्याला एक वाईट बातमी मिळाली की त्याची प्रेयसी प्रियंका झाचा अपघातात मृत्यू झाला आहे. धोनीसाठी हा खूप मोठा धक्का होता. पुढचे अनेक महिने तो त्यातून सावरला नाही. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसे त्याने याच कमकुवतपणाला आपले सामर्थ्य बनवले आणि एका लढवय्याप्रमाणे आयुष्यातल्या पुढच्या संघर्षाला सुरुवात केली.

2004-05 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान, धोनीने विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या सामन्यात केवळ 123 चेंडूत 148 धावा करून इतिहास रचला. ही खेळी वनडे क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाने खेळलेली सर्वात मोठी खेळी होती. त्याच वर्षाच्या अखेरीस धोनीने हा स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. त्याने श्रीलंकेविरुद्ध 183 धावांची इनिंग खेळून पुन्हा क्रिकेट जगताला हादरा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news