

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भर दुपारी एकची वेळ.. टळटळीत उन्हात खा.सुप्रिया सुळे शहरातील वेताळवाडी टेकडी पाहण्यासाठी आल्या. तोच त्यांच्यावर राजकीय प्रश्नांचा भडिमार झाला. अजित पवार नेमके कुठे आहेत..या प्रश्नावर त्या थोड्या रागावल्या नंतर भावूक होत म्हणाल्या फोन लावून पहा.. दादा विधान भवनातच आहेत.
वेताळवाडी टेकडी वाचावा असे अभियान हाती घेत नागरिकांनी लढा सुरु केला आहे. त्यांचे म्हणणे ऐकुन घेण्यासाठी खा. सुप्रिया सुळे या गोखले नगर परिसरातील वेताळवाडी टेकडीवर आल्या होत्या. तेथे त्यांना पत्रकारांनी गाठले. पण भडिमार झाला राजकीय प्रश्नांचा.अजित पवार कुठे आहेत..ते प्रसार माध्यमांशी का बोलत नाहीत. ते राष्ट्रवादी कॉग्रेस सोडणार अशी चर्चा आहे..यावर तुमचे मत काय.
या प्रश्नांवर सुरुवातीला त्या रागावल्या. पण लगेच भावूक होत म्हणाल्या, लावा दादांना फोन, विचारा त्यांना कुठे आहात? ते विधान भवनातच आहेत. तूमच्या या चर्चांना काही अर्थ नाही. मी सतत टिव्ही चॅनल पहात नाही.व र्तमानपत्र वाचते. त्यामुळे मला दर तासाचे अपडेट नसतात. मला तुम्ही फेसबुक,व्टिटरच्या लिंक पाठवा मग मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देते.