Latest
MP Accident : मध्य प्रदेशमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात; ६ जण जागीच ठार
पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील सागर-दमोह मार्गावरील बामोरी डंडर गावाजवळ रविवारी (दि.१७) सायंकाळी ट्रक आणि कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचे तुकडे झाले आणि त्यातील सहा जण जागीच ठार झाले. तर एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान ट्रक चालकाची ओळख पटली असून त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

