चंद्रपुरात मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

चंद्रपुरात मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरातील ठिकठिकाणावरून महागड्या मोटार सायकलची चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये कार्तिक राजू खंडाळे (वय २४), कुनाल यशवंत गर्गेलवार (वय ३८),चंद्रकांत उर्फ पप्पू मेजर वामनराव मानमोडे (वय ४३ रा. विठ्ठलवार्ड, चंद्रपूर) असे आरोपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश रामटेके (रा. पठाणपुरा वार्ड) याने बुलेट एका इमारतीच्या पार्किंग मध्ये लावली असता चोरट्यांनी लांबविली. तसेच फिर्यादी अमित कांबळे (रा. पठाणपूरा वार्ड) यांनी पल्सर मोटारसायकल सैनानी हॉस्पीटल समोर ठेवली होती. तो उपचार करण्यासाठी हॉस्पीटलमध्ये आला होता. अज्ञात चोरट्यांनी पल्सरही लांबविली होती. तर मनोहर सिंग राठोड (रा. भानापेठ) यांनी आपल्या घरासमोर पल्सर मोटार सायकल ठेवली होती. सकाळी बघितले असता त्या ठिकाणी मोटारसायकल आढळून आली नाही. त्यामुळे तिन्ही फिर्यादींनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

गुन्हे शोध पथकाला या बाबत माहिती देऊन चंद्रपूर शहरात मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे पोलीस अधीक्षक रविंद्र सिंग परदेश, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी निर्देश दिले होते. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कार्तिक राजू खंडाळे (वय 24), कुनाल यशवंत गर्गेलवार (वय 38),चंद्रकांत उर्फ पप्पू मेजर वामनराव मानमोडे (वय 43, रा. विठ्ठलवार्ड चंद्रपूर) या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून विचारपूस केली असता तीन मोटारसायकल चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यापैकी दोन पल्सर त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आल्या. तसेच एक बुलेट मोटारसायकल पठाणपुरा घाट स्मशान भूमीजवळ लपवून ठेवल्याची कबुली आरोपींनी दिली. तिन्ही महागड्या मोटारसायकल हस्तगत करून पोलिसांनी मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.