पुणे : आजारपण व गरिबीला कंटाळून आई पाठोपाठ मुलीने जीवनयात्रा संपवली

मृतदेह
मृतदेह
Published on
Updated on

पुणे/खडकवासला ; पुढारी वृत्तसेवा

गंभीर आजारपण आणि गरिबीला कंटाळून प्रथम आईने नंतर आईच्या सेवेसाठी अविवाहित असलेल्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मायलेकींच्या अपार प्रेमाच्या नात्याची शेवट असा दुर्दैवी प्रकाराने मुत्यु होण्याचा हा प्रकार खडकवासला जवळील किरकटवाडी गावात आज (शुक्रवार) मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. संगिता दत्तात्रय खपाले (वय ५०) असे मृत आईचे व रेखा दत्तात्रय खपाले (वय २८) असे मृत मुलीचे नाव आहे.

खपाले कुटुंब गेल्या १५ वर्षांपासून किरकटवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ एका भाड्याच्या घरात राहत आहे. मृत संगिता या गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजारी आहेत. थोरल्या मुलीचे लग्न झाले आहे. त्यांची सेवा त्यांची धाकटी मुलगी रेखा करत होती. मुलगा सुरज याचे किरकटवाडी फाट्यावर दुचाकी दुरुस्तीचे गँरेज आहे.

कोरोनाच्या निर्बंधामुळे गँरेज जवळपास बंदच आहे. संगिता या लहान मोठी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होत्या. मात्र आजारपणामुळे त्यांना हालचाल करणेही जमत नव्हते. त्यांना उदरनिर्वाहाला कोणतेही साधन नाही. त्यांचे पती दत्तात्रय हे तीन महिन्यापुर्वी मुळ गावी सोलापूर जिल्ह्यात गेले आहेत.

गरिबी व गंभीर आजारपणामुळे संगीता या चिंताग्रस्त होत्या. आईच्या सेवेसाठी रेखा हिने लग्न करण्यास नकार दिला होता. आधी भाऊ सुरजने लग्न करावे. त्यामुळे सुन आईची सेवा करेल नंतर माझे लग्न करावे असे ती आईला सांगत असे. अखेर आईचे गंभीर आजारपण व दररोजच्या उदरनिर्वाहाची चिंता यामुळे त्रस्त झालेल्या मायलेकींनी दुर्दैवी जीवनयात्रा संपवली.

रेखा हिने आई आजारी असल्याने आत्महत्या केल्याचे आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठीत नमूद आले आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहिते म्हणाल्या, रात्री ते पहाटेच्या दरम्यान प्रथम आई संगिता हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. नंतर मुलगी रेखा हिने आत्महत्या केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास संगिता आणि रेखा यांनी स्वयंपाकघरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरज पहाटे दोन च्या सुमारास स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेला. तेव्हा आई आणि बहिणीने गळफास घेतल्याचे दिसले. हा प्रकार समजल्यानंतर सरपंच गोकुळ कंरजावणे यांनी घटनेची माहिती हवेली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

रेखाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात तिने 'आईच्या आजारपणामुळे हाल होत आहेत. तिची अवस्था पाहवत नाही,' असा मजकूर लिहला आहे. आज सकाळी ससुन रुग्णालयात दोन्ही मुतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी आकस्मिक मृत्‍युची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news