

नवी दिल्ली : जगभरात अनेक ठिकाणी अतिशय महागडे पदार्थ पाहायला मिळतात. त्यांची अव्वाच्या सव्वा किंमत पाहिल्यावर आपल्यापैकी अनेकजण 'त्याला असे काय सोने लागलंय आहे?' असा प्रश्न विचारतील. मात्र, यापैकी अनेक पदार्थांना खरोखरच सोनेही चिकटलेले असते. अर्थात त्यांच्यावर सोन्याचा वर्ख लावलेला असतो. अशाच काही पदार्थांची ही माहिती…
जगातील सर्वात महागडा पिझ्झा
आपल्यापैकी अनेकांना पिझ्झा खायला आवडतो. जगातील सर्वात महागडा पिझ्झा खायचा असेल तर तुम्हाला न्यूयॉर्कचं तिकीट काढावं लागेल. इथल्या पिझ्झाची किंमत 1.5 लाख रुपये असून त्याचं नाव जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड 24 कॅरेट असं आहे. या पिझ्झावर 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावलेला असतो.
अमेरिकेच्या शिकागोमध्ये बर्को रेस्टॉरंटच्या पॉपकॉर्नची किंमत लाखोंमध्ये आहे. या ठिकाणी 6.5 गॅलन टिनची किंमत 1,87,855 रुपये आहे. हे पॉपकॉर्न 24 कॅरेट सोन्याच्या वर्खाने मढवलेले आहेत.
तुम्ही 4.50 लाखांच्या बर्गरबद्दल कधी ऐकलंय का? नेदरलँडमधील 'डे अल्टोन्स वूरझुईझेन' या रेस्टॉरंटमध्ये 'द गोल्डन बॉय' नावाचा बर्गर बनवला जातो, जो शेफ रॉबर्ट जे डी वीन बनवत असून त्यात सोनेरी पानांचा समावेश असतो.
दुबईच्या स्कूपी कॅफेमध्ये 60 हजारांचे आईस्क्रीम मिळते. हे बनवण्यासाठी इराणमधून केशर आणि ब्लॅक ट्रफल आयात केलं जातं असून यावर 23 कॅरेट सोनं लावण्यात येतं.