

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुतांश घटस्फोट केवळ प्रेम विवाहातूनच होतात, अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने केली. वैवाहिक वादातून झालेल्या हस्तांतरण याचिकेवर सुनावणीवेळी खंडपीठ सुनावणी करत होते.
घटस्फोट प्रकरणी सुनावणीवेळी पक्षकाराच्या वकिलांनी सांगितले की, घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या दाम्पत्याचा प्रेम विवाह होता. यावर न्यायमूर्ती बी.आर.गवई यांनी मत मांडले की, "बहुतांश घटस्फोट हे केवळ प्रेमविवाहातूनच होतात." यानंतर घटस्फोट प्रकरणी न्यायालयाने मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला. याला पतीने विरोध केला. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, नुकत्याच दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, त्याच्या (पतीच्या) संमतीशिवाय घटस्फोट मंजूर केला जाऊ शकतो. ( Love marriages )