Moon : चंद्राच्या मातीत उगवणार चक्क झाड!

Moon
Moon
Published on
Updated on

सिडनी : चंद्राच्या (Moon) मातीत अंकुर फुलणार आहे. इतकंच नाही तर, चंद्रावर हिरवळ पहायला मिळणार आहे. कारण 2025 पर्यंत चंद्रावर झाडे उगवणार असल्याचा दावा केला जात आहे. चंद्रावर मानवाला राहण्यासाठी वस्ती निर्माण करण्याकरिता शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून चंद्राच्या मातीत झाड उगवण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे.

ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी चंद्रावर (Moon) झाडे उगविण्यासाठी विशेष प्रकल्प विकसित केला आहे. या संशोधनात वैज्ञानिकांना यश आल्यास मानवाचा चंद्रावर राहण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा आणखी वाढणार आहे. चंद्रावर पृथ्वीसारखे वातावरण नाही. चंद्राचे तापमान दिवसा 224 ° F (107 ° C) ते रात्री 228 ° F (144 ° C) पर्यंत असू शकते असा संशोधकांचा अंदाज आहे. येथील हवामान पाहता चंद्राच्या पृष्ठभागावर शेती करणे जवळपास अशक्य आहे. चंद्राच्या मातीच्या नमुन्यांचा अभ्यास करणार्‍या संशोधकांनी त्याचे वर्णन काचयुक्त, धातू आणि खनिजांनी समृद्ध असे केले आहे, अशा प्रकारची माती पृथ्वीवर अस्तित्वात नाही. 'क्विन्सलँड युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजी' मधील वनस्पती शास्त्रज्ञ ब—ेट विलियम मागील अनेक वर्षांपासून चंद्रावरील मातीत झाड उगवण्याबाबत संशोधन करत आहेत. खासगी इस्रायली मिशनअंतर्गत बेरेशिट 2 हे अंतराळ यान चंद्रावर पाठवले जाणार आहे.

या यानातूच झाडाच्या बिया चंद्रावर पाठवण्याची योजना आहे. हे यान चंद्रावर (Moon) पोहोचल्यानंतर या बिया एका बंद चेंबरमध्ये ठेवल्या जाणार आहेत. चंद्रावरील मातीतच या बिया रुजवल्या जाणार आहेत. त्यांना पाणी पुरवले जाणार आहे. त्यानंतर त्यांचे अंकुरणे व विकासावर नजर ठेवली जाणार आहे. चंद्रात मातीत रुजवलेल्या या बिया किती दिवसात अंकुरित होतात यावर लक्ष ठेवले जाणार आहे. या सर्वांचा अभ्यास करून विशिष्ट प्रकारच्या रोपांच्या बियांची निवड करण्यात येणार आहे. पिया अंकुरित होऊन रोपटे उगवल्यास प्रतिकूल परिस्थितीत ते कसे जिवंत राहते यावर देखील लक्ष ठेवले जाणार आहे. हे रोपटे उगवून याने चंद्राच्या जमिनीवर तग धरल्यास चंद्रावर ऑक्सिजन आहे का? येथील वातावरण जीवसृष्टीस राहण्यास योग्य आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे संशोधकांना सापडणार आहेत. या संशोधनात यश आल्यास भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती स्थापन करण्यासाठीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यापूर्वी अमेरिकेतील फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी ऐतिहासिक कामगिरी केली होती. 'नासा'च्या अपोलो मिशनच्या अंतराळवीरांनी ही चंद्रावरील माती पृथ्वीवर आणली होती. चंद्राच्या मातीत रोपे उगवण्यात यश आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news