हरभजन सिंगच्या फिरकीने पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची मस्ती जाग्यावर जिरली !

हरभजन सिंगच्या फिरकीने पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची मस्ती जाग्यावर जिरली !
Published on
Updated on

भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. अनेक नेटकऱ्यांनी मोहम्मद शमीला ट्रोल केलं. काल पाकिस्तानने न्युझीलंडविरुद्धही दमदार विजय मिळवला. या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमिरने हरभजन सिंग ला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण मोहम्मद अमिरची ही मस्ती भज्जीने उतरवली. हे सर्व रात्री उशीरा ट्विटरवर सुरु होतं.
अमिरने जोशमध्ये येऊन हरभजन सिंगला ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात केली. न्युझीलंडविरुध्दच्या विजयानंतर मोहम्मद अमिरने एक ट्विट केलं.

"सर्वांना नमस्कार, ते विचारायचे होते की, हरभजन पाजींनी टीव्ही तोडला नाही का? काही होतं नाही, शेवटी क्रिकेट हा एक खेळ आहे." अस मोहम्मद अमिरने पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अमिरच्या या ट्विटला हरभजन सिंगने काहीच उत्तर दिलं नाही. कारण आपण भारताच्या विजयावर शेजारी असणाऱ्या देशांची खिल्ली उडवतो. पण यानंतरही अमिरने हरभजनला चिडवणे सुरूच ठेवले. नंतर मात्र भज्जी शांत बसला नाही. पहिल्यांदाच असे दोन माजी खेळाडू ट्विटरवर भिडले.

अमिरने पुन्हा हरभजनला टॅग करुन ट्विट केलं.

"मी बिझी होतो, हरभजन सिंग तुझी बॉलिंग पाहत होतो. जेव्हा लालाने तुला चार चेंडूत चार षटकार ठोकले होते. क्रिकेट असेल, पण कसोटी क्रिकेटमध्ये ते जरा जास्तच होतं". अस ट्विटमध्ये मोहम्मद अमिरने म्हटलं.

आता अमिरच्या या ट्विटनंतर मात्र हरभजन सिंगचा संयम संपला. त्यान अमिरच्या ट्विटला उत्तर दिलं.

"लॉर्ड्सवर नो बॉल कसा पडला होता? किती घेतले, कोणी दिले? कसोटी सामन्यात नो बॉल कसा पडू शकतो? तुझ्यावर आणि तुझ्या समर्थकांची लाज वाटते खेळाची बदनामी करताय." अस ट्विटमध्ये हरभजनेन म्हटल आहे.

अमिरने हरभजनच्या या ट्विटला लगेच उत्तर दिलं.

"लाला आला पळा पळा" अस या ट्विटमध्ये अमिरने म्हटलं.

अमिरच्या ट्विटलाही हरभजन सिंगने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"अमिर तुमच्यासारख्या लोकांना फक्त पैसा पैसा पैसा…इज्जत नाही फक्त पैसा…तुमच्या देशवासीयांना आणि समर्थकांना सांगणार नाही की, किती मिळाले… इथून निघून जा, मला तुमच्यासारख्या लोकांशी बोलणे आवडत नाही. . ज्यांनी या खेळाचा अपमान केला आणि लोकांना मूर्ख बनवले." असा जोरदार टोला हरभजन सिंगने अमिरला लगावला.

या ट्विट ला अमिरने उत्तर दिले यात त्याने,

" उद्धट. माझ्या भुतकाळाविषयी बोलल्यामुळे तीन दिवसांपूर्वीच सत्य बदलणार नाही. आणि तुझ्या बेकायदेशीर बॉलिंग ॲक्शनच काय? आता बाहेर या आणि आम्ही विश्वचषक जिंकताना पहा. वॉकओव्हर मिळाला नाही, पार्कमध्ये फिरायला जा, तुम्हाला बरे वाटेल." अस या ट्विटमध्ये अमिरने म्हटलं.

या दोघांचा ट्विटर वॉर पुढ वाढतच गेला. हरभजनने त्याच्या पुढील उत्तरात 2010 आशिया कपचा व्हिडिओ ट्विट केला. ज्यात त्याने मोहम्मद अमीरला षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला होता. या व्हिडिओसह भज्जीने ट्विटमध्ये लिहिले,

''फिक्सर को सिक्सर…आउट ऑफ द पार्क…चल निघून जा" अस उत्तर हरभजनने अमिरला दिलं.

मोहम्मद अमिर आणि हरभजन सिंग यांच्यात रात्री उशिरा ट्विटरवर जे काही घडले ते दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांना अजिबात आवडणार नाही. पण या सगळ्यात अमीरने आपल्या संघाचा विजय अशा क्षुल्लक गोष्टींमध्ये विनाकारण गुंडाळला हे मात्र खरं आहे.

मोहम्मद अमिरच्या अगोदर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही भज्जीसोबत असेच काहीसे केले होते. भारताच्या पराभवानंतर त्याने भज्जीची चेष्टा केली होती. पण शोएब अख्तर आणि अमिरच्या कृतीत एक फरक होता. अख्तर आणि भज्जीमध्ये खूप हशा आणि विनोद चालू होता. पण अमिरने भज्जीची चेष्टा करण्याच्या नादात स्वत:ची चेष्टा करुन घेतली.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news