‘पुढारी रिलीफ फौंडेशन’च्यावतीने सीपीआरला अत्याधुनिक रुग्णवाहिका प्रदान

कोल्हापूर: ‘पुढारी’ रिलीफ फौंडेशनच्यावतीने सीपीआरला ‘ ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व दैनिक पुढारीचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, उद्योजक तेज घाटगे, डॉ. महेंद्रकुमार बनसोडे, डॉ. गिरीश कांबळे, डॉ. अपराजित वालावलकर, डॉ. सुदेश गंधम, दैनिक पुढारीचे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, बंटी सांवत आदी. (छाया: पप्पू अत्तार)
कोल्हापूर: ‘पुढारी’ रिलीफ फौंडेशनच्यावतीने सीपीआरला ‘ ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व दैनिक पुढारीचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, उद्योजक तेज घाटगे, डॉ. महेंद्रकुमार बनसोडे, डॉ. गिरीश कांबळे, डॉ. अपराजित वालावलकर, डॉ. सुदेश गंधम, दैनिक पुढारीचे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, बंटी सांवत आदी. (छाया: पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा – दैनिक पुढारी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आला आहे.  सर्वसामान्यांबाबत संवेदनशील असणार्‍या दैनिक पुढारीचे सामाजिक कार्य पिढ्यानपिढ्या स्मरणात राहणारे आहे, असे गौरवोद्‌गार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (दि.५) काढले.

'पुढारी रिलीफ फौंडेशन'च्यावतीने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अत्याधुनिक साधनसामुग्रीने सुसज्ज अशी 'ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट' रुग्णवाहिका मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, दैनिक पुढारीचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, उद्योजक तेज घाटगे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
डॉ. योगेश जाधव यांनी 'पुढारी' समूहातर्फे उपस्थितांचे स्वागत केले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले,  दैनिक पुढारी नेहमीच  सत्याच्या आणि सर्वसामान्यांच्या बाजूने  ठामपणे उभा राहीला. यामुळे 'पुढारी'ची राज्यात तर ताकद आहेच; पण आता राज्याबाहेरही आणि दिल्लीतही 'पुढारी'ची ताकद निर्माण होत आहे. सर्वसामान्यांचे, विकासाचे प्रश्न आणि 'पुढारी'चा पुढाकार हे जणू समीकरणच झाले आहे. समाजाविषयी 'पुढारी'ची असणारी संवेदनशीलता जगातील सर्वोच्च रणभूमीवर  उभारलेल्या सियाचीन हॉस्पिटलमधून दिसून येते. यामुळे 'पुढारी'चे सामाजिक काम पिढ्यानपिढ्या स्मरणात राहणारे आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाकाळात राज्याची आरोग्य यंत्रणा किती कमकुवत आहे ते समोर आले. यामुळे सध्या सरकारने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यास प्राधान्य दिल्याचे सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोना काळात मास्कही आयात करावे लागत होते; पण आता परिस्थिती बदलली आहे. ६० देशांत व्हॅक्सिन निर्यात करून भारताने अनेक देशातील नागरिकांचे जीव वाचवले आहेत. शासकीय रूग्णालयाच्या इमारती आहेत, यंत्रसामुग्री आहे. मात्र, प्रशिक्षित डॉक्टर, तज्ज्ञ राहत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकीतून अशा तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धतता करून देता येईल का, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही बाबतीत आरोग्य विभागाला आर्थिक मर्यादाही येतात. अशा परिस्थितीत 'पुढारी'ने दिलेली ही रुग्णवाहिका म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ती सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित म्हणाले, सध्या प्रशासनाकडे दोनच रुग्णवाहिका आहेत. यापैकी एक रक्तपेढीकडे आहे. यामुळे सुसज्ज अशा रुग्णवाहिकेची गरज होती. 'पुढारी'च्या या रुग्णवाहिकेमुळे आता कितीही गंभीर रुग्णांना घरातून रुग्णालयापर्यंत आणणे अधिक सोईचे होणार आहे. रुग्णालयातील रुग्णांना अन्य उपचारासाठी स्थलांतरित करण्यासाठीही या रुग्णवाहिकेचा मोठा हातभार लागणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णांसाठी या रुग्णवाहिकेचा कसा वापर होईल, या दृष्टीने प्रयत्न राहतील असेही त्यांनी सांगितले. उद्योजक तेज घाटगे यांनी या रुग्णवाहिकेचा अधिकाधिक रुग्णांसाठी वापर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दैनिक पुढारीचे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी प्रस्ताविक केले. विक्रम रेपे यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्रकुमार बनसोडे, डॉ. सुरेश गंधम, डॉ. अपराजित वालावलकर, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. विकास जाधव, 'दैनिक पुढारी'चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर, उद्योजक सुरेंद्र जैन, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, बंटी सांवत आदींसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. योगेश जाधव यांनी नेतृत्व करावे

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. तरुण मंडळे आहेत. या सर्वांना एकत्रित करून, दर तीन महिन्याला त्यांच्याशी संवाद साधत, एकमेकांच्या अडअडचणी, समस्यांविषयी चर्चा करून त्यावर मार्ग काढणे, असा प्रयोग कोल्हापुरात राबविला जावा. त्याचे नेतृत्व दैनिक पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी करावे, अशी अपेक्षाही  पाटील यांनी या वेळी व्यक्त केली.

सीपीआर आता खऱ्या अर्थाने सजले!

रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रम झाल्यानंतर चालकांनी या अत्याधुनिक रुग्णवाहिकेतून एक फेरफटका मारला. यानंतर ही रुग्णवाहिका सीपीआरच्या ऐतिहासिक इमारतीसमोर दिमाखदार दिसेल, अशी उभी करण्यात आली. गंभीर रुग्णांसाठी रुग्णालयात येईपर्यंत ही रुग्णवाहिका संजीवनीच ठरणार आहे. सध्याच्या रुग्णवाहिका चालवताना प्रचंड दमछाक व्हायची, पण आता तसे काही होणार नाही, असे सांगत चालकांनी सीपीआर आता विजयादशमीच्या दिवशी खऱ्या अर्थाने सजले अशी प्रतिक्रिया दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news