

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : चलो ठाणे, उत्तर मिळणारच अशा आशयाचे आमदार राजू पाटील यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यालाच उत्तर देताना राजू पाटील यांनी पाडव्याच्या दिवशी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी विविध विषयावर भाष्य केले होते. त्यानंतर संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले होते. त्याला उत्तर देण्यासाठी ही सभा भरवण्यात आली आहे. या सभेत प्रत्येकाला उत्तर मिळणार. ज्याची जी शंका होती ती राज ठाकरे नक्कीच दूर करणार आहे. (MNS Raju Patil)
राज साहेबांच्या काही भूमिका पूर्वीपासूनच्या आहेत. मात्र आता काही लोकांना हे वक्तव्य जिव्हारी लागले आहे. याला उत्तर देण्यासाठी ही सभा आहे. अशी प्रतिक्रिया मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
दरम्यान अबु आझमी यांच्या वक्तव्यावर आमदार राजू पाटील यांनी पलटवार केला आहे. टाका, दम असेल तर टाकूनच बघा', अशा शब्दात आझमींना आव्हान दिले आहे. पाटील हे दिव्यात काही उपोषण कर्त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. तेव्हा पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी अशा शब्दांत उत्तर दिली.
पाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोगे काढून टाका या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अबू आझमी यांनी टीका केली. ते म्हणाले की, ज्यांच्या पक्षाचा फक्त १ आमदार आहे. ज्यांना राज्यात जनाधार नाही, अशा नेत्यांचे लोकांनी का ऐकायचे? मशिदीमध्ये अजान केवळ दोन मिनिटांसाठीच होते आणि त्याला परवानगी आहे. यामुळे राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे असून त्यांना अटक करुन जेलमध्ये टाकावे, असे आझमी यांनी म्हटले होते.