MLA Disqualification Case : उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांना भाजपसोबत जाण्याचे आश्वासन दिले होते : उदय सामंतांचा गौप्यस्फोट

MLA Disqualification Case :  उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांना भाजपसोबत जाण्याचे आश्वासन दिले होते : उदय सामंतांचा गौप्यस्फोट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच सर्व आमदारांना भाजपसोबत जाण्याचे आश्वासन दिले होते. त्‍यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचे आश्वासन दिल्यामुळेच महाविकास आघाडीत मंत्री म्हणून शपथ घेतली, असा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत (Uday Samant ) यांनी आज (दि. ११) केला. ( MLA Disqualification Case)

आमदार अपात्रता सुनावणी ( MLA Disqualification Case ) विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. आज ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून उदय सामंत यांच्या उलटतपासणी झाली. २०१९ ते २०२२ या काळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री झालात इतके तुम्ही नाराज होतात का ? असा सवाल यावेळी कामत यांनी सामंत यांना केला.

काही कालावधीनंतर भाजपाला सोबत घेऊनच सरकार स्थापन केले जाईल

सामंत यांनी सांगितले की, मंत्री पदाची शपथ घेतली त्‍यापूर्वी आम्‍ही गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांना भेटलो होते. काही कालावधीनंतर भाजपाला सोबत घेऊनच सरकार स्थापन केले जाईल. काही कालावधीनंतर तुम्ही केलेली मागणी मान्य केली जाईल. असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते.त्‍यांनी दिलेल्‍या आश्‍वासनामुळे मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या महाविकास आघाडी सरकारनेमध्‍ये सहभागी झालो होता, असा खुलासा सामंत यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news