

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची दिग्गज महिला क्रिकेटर मिताली राज हिने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. ८ जून रोजी तिने ट्विटरवरून एक भावनिक संदेश प्रसिद्ध करत या निर्णयाची घोषणा केली. मिताली तब्बल २३ वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा करत राहिली. अखेर ३९ वर्षी तिने आपल्या प्रदिर्घ क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम दिला. (Mithali Raj trolled Are you porn star?)
आपल्या शानदार खेळीच्या जोरावर मितालीने अनेक मोठे विक्रम बनवले. २३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तिने देशातील महिला क्रिकेटचे चित्र बदलून टाकले. १९९९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या मितालीने देशातील महिला क्रिकेटपटूंना नवा मार्ग दाखवला. तिच्या या चमकदार प्रदर्शनाच्या जोरावर मिताली अनेकांची आयडॉल बनली. पण असे असूनही सोशल मीडियात ती अनेकवेळा ट्रोल झाली. आता हेही खरं आहे की, ट्रोल करणाऱ्यांना कोणत्याही खेळाडूचे कर्तृत्व दिसत नाही, त्यांना फक्त एक संधी हवी असते, कुणालाही टार्गेट करण्यासाठी. २०१७ मध्ये मिताली राजसोबत असेच काहीसे घडले होते. जेव्हा एका चाहत्याने तिला चक्क पॉर्न स्टार म्हणत अश्लील कमेंट केली होती. (Mithali Raj trolled Are you porn star?)
खरंतर त्यावेळी मितालीने तिच्या मैत्रीणींसोबत एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने स्पेगेटी टॉप परिधान केला होता, पण ट्रोलर्सनी मिताली धारेवर धरत निशाणा साधला आणि योग्य कपडे घालण्याचा सल्ला दिला. हे ट्रोलिंग आणखीनच खालच्या पातळीवर गेले जेव्हा एका युजरने विचारले की तू पॉर्न स्टार आहेस का? ट्रोलरच्या या अश्लील कमेंटनंतर सोशल मीडियावरचे वातावरण तापले. अनेक युजर्संनी ट्रोलरला प्रत्युत्तर दिले. तसेच त्यांनी मितालीची पाठराखण करत तिला आधार दिला. मितालीच्या काही चाहत्यांनी तर त्या ट्रोलरला 'तू पॉर्न पाहणे बंद केले पाहिजे' असे म्हणत कानउघडणी केली. (Mithali Raj trolled Are you porn star?)
मितालीने १९९९ मध्ये एकदिवसीय आणि २००२ मध्ये कसोटी पदार्पण केले. २००६ मध्ये त्याने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मितालीने भारतासाठी १२ कसोटी, २३२ एकदिवसीय आणि ८९ टी-२० सामने खेळले आहेत. तिच्या नावावर ६९९ कसोटी धावा (१ शतक, ४ अर्धशतके) आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २१४ आहे. यासोबतच तिच्या नावावर ७ हजार ५०८ वनडे धावा (७ शतके, ६४ अर्धशतके) आहेत. तिच्या नावावर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाबाद १२५ धावांची सर्वात मोठी खेळी आहे. त्याच ८९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मितालीने एकूण २ हजार ३६४ धावा केल्या. तिच्या नावावर टी २० मध्ये १७ अर्धशतके आहेत. (Mithali Raj trolled Are you porn star?)