सत्तासंघर्षाच्या निकालानंतर सोशल मीडियावर मिम्सचा धूमाकूळ; नेटकऱ्यांनी केले विश्लेषण अन् ओढले कडक ताशेरे

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर सोशल मीडियावर मिम्सचा धूमाकूळ; नेटकऱ्यांनी केले विश्लेषण अन् ओढले कडक ताशेरे
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सत्तासंघर्षावरील बहुप्रतिक्षित निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने जाहीर केला. या निकालावर नेटकऱ्यांनी आपापली प्रतिभा आणि कल्पनाशक्ती वापरत केलेल्या विनोदी, तिरकस विश्लेषणांच्या मेसेजचा पाऊसच सोशल मीडियावर पडू लागला. व्हाटस् अॅपच्या विविध ग्रपवरही निकालावरील मीम्स्, विनोदी मेसेज मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केले गेले. एकूणच निकालापेक्षा त्याच्या रंजक प्रतिक्रीयाच लक्षवेधी ठरल्या. सर्वोच्च न्यायालयातील निकाल वाचनानंतर अवघ्या काही मिनिटांत निकालावरील विनोदी मेसेज फॉरवर्ड होऊ लागले.

  • 'याला म्हणतात, ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशन्ट मेला' या एका वाक्यातील मेसेजसोबतच अभिनेता अशोक सराफ यांचे गाजलेले पात्र प्रोफेसर धोंड यांनीही न्यायालयाचा निकालाची बोधकथा सांगितली.
  • 'आजचे तात्पर्य अभ्यास झाला नसेल तरी अवघड पेपर सोडवायचा प्रयत्न करायचा असतो. पेपरलाच दांडी मारली तर पास होण्याच्या सगळ्या शक्यता मावळतात' असा मौलिक सल्ला यातून दिला गेला.
  • तर, हाच सल्ला क्रिकेटच्या भाषेत महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्या नावावर फिरवले गेले. 'कुणाच्या फेक अपीलवर मैदान सोडायचे नसते. आधी सोबत खेळर्णायाला विचारायचे, मग अंयायरला. नाही पटले तर थर्ड अंपायरकडे जायचे. त्याने आऊट दिल्यावरच मैदान सोडायचे', असा आयुष्याषा धडाच सोशल मीडियात फिरू लागला.
  • आजचा कोर्टाचा निकाल ज्यांना कळला नाही त्यांना क्रिकेटचे उदाहरण देऊन सांगतोय, असे म्हणत एक मेसेज तर तुफान व्हायरल झाला. शिंदे यांनी ठाकरेंना नोबॉल टाकला. फडणवीसांनी अंपायरकडे खोटी अपील केली. अंपायर कोशारी यांनी चुकीचा निर्णय देत आऊट दिले. आणि अशाप्रकारे नोबॉलवर ठाकरेंची विकेट घेतली. पण थर्ड अंपायरचा निर्णय येईपर्यंत ठाकरे मैदान सोडून मातोश्रींकडे जाऊन बसले. त्यामुळे आता त्यांना परत बॅटिंगला बोलवता येणार नाही. ते मैदानावरच असते, तर त्यांना परत बॅटिंग करायला लावली असती. आता उरलेली मॅच कंटिन्यू करा., असं थर्ड अंपायर म्हणतोय. हा बहुदा निकालावर सर्वाधिक फॉरवर्ड झालेला मेसेज ठरला असावा.
  •  मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर, एकमेकांची पसंती बेकायदेशीर, साखरपुडा बेकायदेशीर, लग्न बेकायदेशीर, पण झालेले बाळ मात्र कायदेशीर…' असे व्हाटस अॅप युनिर्व्हसिटीचे साभार मेसेजही आले. त्यावर 'त्यात बिचाऱ्या बाळाची काय चूक' अशी मल्लीनाथी करत सुस्कारेही सोडले गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news