

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वंशाचे मिकी होथी (Mikey Hothi) हे कॅलिफॉर्नियामधील लोदी शहराचे महापौरपदी (California's First Sikh Mayor) निवड झाली आहे. त्यांचे आईवडील हे मूळचे भारतीय वंशाचे आहेत. विशेष म्हणजे शहराच्या इतिहासात ते पहिले शीख महापौर ठरले आहेत. ११७ वे महापौर बनल्यानंतरचा आनंद व्यक्त करणारे ट्विट देखील होथी यांनी केले आहे.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये लिसा ग्रेग या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. या निवडणूकीनंतर पार पडलेल्या बैठकीमध्ये ग्रेग यांनी होथी यांचे नाव महापौर पदासाठी सुचवलेले होते. त्याचबरोबर या बैठकीमध्ये उपमहापौरपदाच्या निवडीबाबतही चर्चा झाली. या निवडीनंतर "लोदी शहराचे ११७ वे महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे, ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे," असे होथी यांनी ट्विट केले होते. (California's First Sikh Mayor)
होथी हे कौन्सिलच्या पाचव्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. गेल्या वर्षी त्यांनी महापौर चँडलर यांच्या अंतर्गत ते उपमहापौर राहिले आहेत. येथील स्थानिक वृत्तपत्र द लोदी न्यूजनुसार, आर्मस्ट्राँग रोडवरील गुरुद्वारा उभारण्यात होथी यांच्या कुटुंबाचे महत्त्वाचे योगदान होते.
हेही वाचा :