मर्लिनच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम!

मर्लिनच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : हॉलीवूडमध्ये तीन त्रिदेव आहेत, असे म्हटले जात होते. त्यात मार्लोन ब्रँडो, अल पसीनो आणि रॉबर्ट डी नीरो यांचा समावेश होतो. जर अभिनेत्रींचे नाव घेतल्यास आजही मर्लिन मन्रो आघाडीवर आहे. 50 आणि 60 च्या दशकात एक मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि आपल्या मादकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मन्रोचे आयुष्य हे एखाद्या चित्रपटातील रीलप्रमाणे होते. त्यात नाट्य, दु:ख रोमांच यांचा समावेश होता. तिच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे हे विशेष!

1 जून 1926 रोजी लॉस एंजेलीस येथे मर्लिन मन्रोचा जन्म झाला. लाईटस्, कॅमेरा, फॉटोग्राफर्स आणि पत्रकार यांनी वेढलेल्या मर्लिनच्या त्या उडणार्‍या स्कर्टच्या फोटोची चर्चा आजही होते. 1953 मध्ये आलेला मेलोड्रामा चित्रपट 'नियाग्रा' मध्ये तिने केलेला अभिनय आजही लोकांच्या आठवणीत आहे. मन्रोचे मादक डोळे आणि सोनेरी केस यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडायची. विशेषतः तिच्या दिलखुलास, मोहक हास्याची मोहिनी आजच्या पिढीवरही कायम आहे. 1955 मध्ये आलेला 'द सेव्हन इयर इच' या चित्रपटामध्ये तिने केलेली मुलीची भूमिका विशेष गाजली. चित्रपटांमध्ये मन्रोचे हवेत उडत असलेले स्कर्टचे द़ृश्य कैद करण्यासाठी जगभरातून प्रयत्न झाला; पण तिच्यासारखी अदा दाखवण्यात सर्व सिनेतारका फिक्या पडल्या.

1999 मध्ये अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने मन्रोला जगातील सर्वात महान अभिनेत्री म्हणून घोषित केले. मन्रोने तीन वेळेस विवाह केला. पहिला जेम्स डोहर्टी, दुसरे जो डीमॅगो आणि तिसरे आर्थर मिलर यांच्याबरोबर विवाह केला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्याशी तिचे प्रेमप्रकरण होते असे म्हटले जाते. 1962 मध्ये अवघ्या 36 व्या वर्षी मर्लिन राहत्या घरी मृत अवस्थेत आढळली. झोपेच्या जास्त गोळ्या घेतल्याने तिचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले होते. तिने आत्महत्या केली, असेही मानले जाते; पण अद्याप तिच्या मृत्यूचे कोडे सुटलेले नाही.

मर्लिनच्या रूममधून आवाज येत नाही, असे मर्लिनसोबत असणार्‍या हाऊसकिपरला 5 ऑगस्ट 1962 जेव्हा लक्षात आले. त्या हाऊसकिपरने मर्लिनच्या मानसोपचारतज्ज्ञाला फोन केला. रूमची खिडकी तोडून जेव्हा हाऊसकिपर रूममध्ये गेला. तेव्हा मर्लिन ही त्याला बेडवर पडलेली दिसली. तिच्या हातात टेलिफोन होता. बेडजवळ एक रिकामी बॉटल होती. मर्लिनने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला? हे अजूनही कोणाला माहीत नाही. अनेकांचे असे मत आहे की, हाऊसकिपरला नोकरीवरून मर्लिनने काढलं म्हणून त्यानं तिचा खून केला. मर्लिन मन्रोचा मृत्यू हा आजही चर्चेचा विषय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news