

सोलापूर : सोलापूरकर मानसिक शांती मिळविण्यासाठी योगासनाबरोबरच ध्यानधारणेकडे वळत आहेत. त्यांच्यासाठी शहरात तब्बल २० हून अधिक मंदिरांमध्ये ध्यान मंदिरे बांधण्यात आली आहेत. मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी 'करा रे ध्यान, मन होईल तरुण, तणावमुक्त अन् प्रसन्न' म्हणत ध्यान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सकाळी आणि संध्याकाळी ध्यान मंदिर गाठून ध्यानस्त होणारे संसारिक पुरुष सोलापुरात दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, माता, पिता, मुले, भावंडे, नातेवाईक आणि मित्र परिवाराचा गोतावळाही असतो. ध्यान केवळ मनासाठीच नाही, तर आपल्या शरीरासाठीही महत्त्वाचे आहे. हे केवळ चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत करत नाही, तर शारीरिक आणि मानसिक वेदना हाताळण्यासाठी देखील फायदेशीर आहे.