Meditation : ध्यानामुळे मेंदूत नेमके काय बदल होतात? संशोधनात समोर आली ‘ही’ माहिती

Meditation
Meditation
Published on
Updated on

लंडन : प्राचीन भारतीय संस्कृतीने जगाला दिलेल्या अनमोल देणग्यांमध्ये योगविद्येचा समावेश होतो. अष्टांग योगामध्ये ध्यानाचा समावेश होतो. सध्या जगभर अनेक लोक ध्यान करून त्याचे लाभ घेत आहेत. ध्यानामुळे खरोखरच मेंदूमध्ये सकारात्मक परिणाम होतो का हे पाहण्यासाठी मेलिसा हॉगेनबूम या महिलेने स्वतःवरच प्रयोग करून पाहिला. त्यामधून तिलाही आपल्यामध्ये ध्यानाने चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले.

मेलिसा हॉगेनबूम या विज्ञान विषयात पत्रकारिता करतात. आयुष्यातील काही गोष्टी बदलून मेंदूचे आरोग्य सुधारता येऊ शकतो, असा त्यांचा विश्वास आहे. सर्वप्रथम त्यासाठी त्यांनी स्वत:चा मेंदू स्कॅन करून घेतला. त्याची 'फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एफआमआरआय) म्हणजेच 'कार्यात्मक चुंबकीय अनुनाद इमेजिंग' चाचणी करण्यात आली. मेलिसाला ही चाचणी आणि पुढील सहा आठवड्यांच्या प्रयोगानंतरच्या चाचण्यांची एकमेकांशी तुलना करायची होती. तिला यावरून तिच्या मेंदूत काय बदल झाले हे समजून घ्यायचे होते. या चाचणीचे निकाल जाणून घेण्यासाठी तिने वैद्यकीय मानसशास्त्रज्ञांची मदत घेतली. ती म्हणते, 'ध्यानासारखी सामान्य वाटणारी गोष्टसुद्धा मेंदूमध्ये बदल घडवून आणू शकते याचं मला खूप आश्चर्य वाटलं, पण प्रश्न असा आहे की ते माझ्या मेंदूसाठी परिणामकारक ठरेल का? 'तिने सांगितलं की, 'मानसशास्त्रज्ञ थॉर्स्टन बर्नहॉफर यांनी ध्यानाशी संबंधित एक संशोधन अभ्यासक्रम पुढील सहा आठवड्यांसाठी मला करायला दिला.

यामध्ये मी दररोज एक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकत 30 मिनिटे ध्यान करत होते. याशिवाय इतरही काही उपक्रम केले जात होते.' ध्यानाची परंपरा हजारो वर्षे जुनी आहे. पण अलीकडच्या काही दशकांमध्येच मानसशस्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांनी या विषयावर सखोल संशोधन सुरू केले आहे. विविध संशोधनाअंती ध्यानाची उपयुक्तता सिद्ध झाल्यानंतर आता ध्यान करण्याची शिफारस केली जाऊ लागली आहे. जर्मनीतील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्यूनिकच्या संशोधक बि—टा होल्झल आणि अमेरिकेतील मॅसाच्युसेटस् जनरल हॉस्पिटलच्या संशोधक सारा लाझर यांनी सांगितले की, मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरते. सहा आठवडे पूर्ण झाल्यावर या प्रयोगाचा तिच्या मेंदूवर काय परिणाम झाला हे जाणून घेण्याची मेलिसाला उत्सुकता होती.

पुन्हा एकदा तिने आपल्या मेंदूचे स्कॅनिंग केले आणि नंतर दोन्ही चाचण्यांचे अहवाल मानसशास्त्रज्ञ बर्नहोफर यांना दाखवले. बर्नहोफर यांनी दोन्ही स्कॅन अहवाल पाहिले आणि मेलिसाला सांगितले की तिच्या मेंदूतील बदल स्पष्टपणे दिसत आहेत. तिच्या मेंदूच्या उजव्या बाजूला असलेल्या 'अमिग्डाला'च्या अर्ध्या भागाचा आकार कमी झालेला दिसून आला. 'अमिग्डाला' ही मेंदूतील बदामासारखी रचना आहे ज्याला भावना किंवा भावनांचे केंद्र म्हणतात. हा बदल अगदी किरकोळ पण स्पष्टपणे दिसत होता. मेलिसाच्या प्रयोगाचे परिणाम शास्त्रज्ञांच्या प्रकाशित संशोधनाच्या दिशेने घेऊन जातात ज्यात असे म्हटले आहे की, ध्यान केल्याने 'अमिग्डाला'चा आकार कमी होतो. तणावामुळे त्याचा आकार वाढतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news