

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : पासपोर्ट जारी करण्यासाठी पोलिस पडताळणीची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने आज (शुक्रवार) 'mPassport पोलिस अॅप' लाँच केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या कर्मचार्यांना 350 मोबाईल टॅब्लेट दिले. ही उपकरणे आता पोलीस पडताळणी (mPassport Police App) आणि अहवाल सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस करण्यास सक्षम करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या दिल्लीच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने म्हटले आहे.
दिल्लीचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी अभिषेक दुबे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, टॅब्लेट (mPassport Police App) वापरून पडताळणी केल्याने पडताळणीची वेळ 15 दिवसांवरून पाच दिवसांपर्यंत कमी होईल, तर प्रभावीपणे पासपोर्ट जारी करण्याची वेळ दहा दिवसांपर्यंत कमी होणार आहे.
शहा यांनी गुरूवारी हिंदीमध्ये ट्वीट करून पासपोर्टच्या जलद पडताळणीसाठी पासपोर्ट मोबाईल ॲप्लिकेशन लाँच केले. डिजिटल व्हेरिफिकेशनमुळे वेळेची बचत होईल तसेच पोलीस तपासात पारदर्शकता येईल, असे म्हटले आहे.
अमित शहा यांनी पुढे म्हटले की, "आज उचललेले हे पाऊल स्मार्ट पोलिसांसाठी मोदीजींच्या पोलिस तंत्रज्ञान मिशनच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहेत."
हेही वाचा :