Aam Aadmi Party
Aam Aadmi Party

Delhi MCD Election Results : दिल्ली महापालिकेत ‘आप’ सुसाट : बहुमताचा आकडा पार

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली महापालिकेच्या (एमसीडी) निवडणुकीची (Delhi MCD Election Results) मत मोजणीला आज (दि. ७) सकाळी आठपासून सुरूवात झाली आहे. आतापर्यंत एकूण २५० जागांपैकी १३२ जागा घेऊन आप आघाडीवर आहे. तर भाजपला १०४ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसने १० जागा जिंकल्या आहेत. तर इतरांना ४ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, आपने बहुमताचा आकडा पार केल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

(Delhi MCD Election Results) काँग्रेसचे उमेदवार अरिबा खान यांनी अबुल फजल यांचा पराभव केला आहे. काँग्रेसने जकीर नगरची जागा ताब्यात घेतली आहे. तर भाजपने सरस्वती विहार, पश्चिम विहार आणि राणी बाग या तिन्ही जागा जिंकल्या आहेत. आम आदमी पक्षाचे उमेदवार बॉबी किन्नर यांनी सुलतानपुरी प्रभागातून निवडणूक जिंकली आहे.

आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले की, आम्ही १८० हून अधिक जागांवर विजय मिळवू. बहुमताचा आकडा पार केल्याने आपच्या कार्यालयात आनंदाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी जल्लोषाचे तय़ारी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news