mark zuckerberg followers : मार्क झुकेरबर्गला १२ कोटी फॉलोअर्सने सोडले! मेटाच्या युजर्समध्ये देखील मोठी घट

फेसबुक
फेसबुक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया साइट फेसबुकचे अनेक युजर्स आहेत. मात्र सध्या या लोकप्रिय सोशल मीडियाचे युजर्स कमी झाले आहेत. यापाठोपाठच फेसबुकचे संस्थापक, सीईओ मार्क झुकेरबर्ग यांचे फॉलोअर्सदेखील ११.९ कोटींनी कमी झाले आहेत.

परिस्थिती सुधारण्‍यासाठी प्रयत्न सुरु…

फेसबुकची लोकप्रियता कमी होत असल्याच्या मुद्यावर बोलताना बांग्लादेशी लेखिका तस्लीमा नसरीन म्हणाल्या की, फेसबुकवर त्सुनामी आली आहे. ज्यामुळे माझे जवळपास ९ लाख फॉलोअर्स माझ्या लिस्टमधून निघून गेले आहेत, आता फक्त ९००० राहिले आहेत. फेसबुकची ही चेष्टा मला आवडते. याविषयी फेसबुकच्या प्रवक्त्याशी संपर्क केला असता म्हटले आहे, आम्हाला माहित आहे की काहींच्या फेसबुक प्रोफाईलवरील फॉलोअर्सच्या संख्येत बदल होत आहेत. आम्ही ही परिस्थिती लवकरात लवकर पुर्नवत करण्याचा प्रयत्न करत आहे. या गैरसोईबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत असल्याचेही मेटाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

कंपनीच्या रीब्रँडिंगमुळे आणि मेटाव्हर्सवर फोकस वाढल्याने झुकेरबर्गला मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. यावर्षी मार्क झुकेरबर्गची संपत्ती जवळपास निम्म्याने कमी झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती जागतिक अब्जाधीशांमध्ये 20 व्या क्रमांकावर आहे. हा क्रम गेल्या आठ वर्षांतील निच्‍चांकी आहे.

झुकेरबर्गच्या संपत्तीत सुमारे ७१ अब्ज डॉलरची घट

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, झुकेरबर्गच्या संपत्तीत सुमारे ७१ अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्यानंतर मार्क यांची एकूण संपत्ती ५६ अब्ज डॉलरवर आली आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत जागतिक अब्जाधीशांमध्ये जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यानंतर मार्क झुकेरबर्ग हे तिसरे होते. गेल्यावर्षी मार्क यांची संपत्ती गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये १४२ अब्ज डॉलर इतकी होती. त्यानंतर त्यांनी आपल्या कंपनीचे नाव बदलून फेसबुक वरून मेटा करण्यात आले. त्यानंतर झुकेरबर्ग यांच्या अडचणीत वाढ झाली.

'या' कारणांमुळे फॉलोअर्समध्‍ये घट

आर्थिक मंदीचा देखील परिणाम मेटाच्या व्यवसायावर झाला आहे. याचा परिणाम म्हणजे मेटाव्हर्समध्ये कंपनीच्या गुंतवणुक आणि स्टॉकमध्ये मोठी कमजोरी येत आहे. येत्या काही वर्षांत या प्रकल्पावर मोठा खर्च होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शिवाय कंपनीला काही नियमांचा आणि कायदेशीर बाबींचाही सामना करावा लागत आहे. या कारणांनी मार्क झुकेरबर्गला १२ कोटी फॉलोअर्सने सोडले आणि मेटाच्या युजर्समध्ये देखील मोठी घट दिसून येत आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news