Google Doodle On Maria Telkes : ‘द सन क्वीन’ मारिया आहेत तरी कोण; ज्यांचे गुगलने बनवले डूडल

Google Doodle On Maria Telkes
Google Doodle On Maria Telkes
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्‍क : गुगलकडून सौर ऊर्जा शास्त्रज्ञ मारिया यांच्या सन्मानार्थ ॲनिमेटेड Google डूडलसह लोगाे बनवला आहे. मारिया यांना 'द सन क्वीन' या नावाने देखील ओळखले जाते. मारिया यांचा जन्म हंगेरियन शहरात 12 डिसेंबर 1900 रोजी झाला होता. त्यांनी 1924 मध्ये बुडापेस्ट विद्यापीठातून पीएचडीसह विज्ञानाचे संपूर्ण शिक्षण घेतले. त्या वर्षाच्या शेवटी, मारिया यांनी अमेरिकेत एका नातेवाईकाला भेट दिली आणि त्‍यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.

मारिया टेल्केस यांना सौरऊर्जेची बालपणापासून आवड

मारिया यांनी सुरुवातीला बायोफिजिक्स आणि नव्या विचारांनी निर्माण केलेल्या उर्जेवर संशोधन करायचे ठरवले होते. उष्णतेचे ऊर्जेत कसे रूपांतर करता येईल यात त्‍यांना रस होता. ते 1939 मध्ये एमआयटी संशोधन गटात सामील झाले, जे फक्त सौर ऊर्जेवर केंद्रित होते. दुस-या महायुद्धादरम्यान, अमेरिकेच्या वैज्ञानिक संशोधन आणि विकास कार्यालयाने मारिया यांना नोकरी दिली. जेणेकरून त्‍यांच्या कल्पनेतून नवीन तंत्रज्ञानावर काम करता येईल. त्याने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या डिस्टिलरने समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवले, जेणेकरून समुद्रात हरवलेल्या सैनिकांना पाणी पिता येईल. हा त्यांचा सर्वात मोठा शोध होता.

सौर ओव्हनचा शोध लावला 

1948 मध्ये, त्यांनी वास्तुविशारद एलेनॉर रेमंड यांच्यासोबत एक प्रणाली तयार केली जी सूर्यप्रकाशापासून भिंती गरम करू शकते. त्यांनी 1953 मध्ये एमआयटी सोडली आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सौर ऊर्जा संशोधन सुरू केले होते. तेथे त्यांनी सौरऊर्जेवर चालणारा ओव्हन तयार केला.

त्‍यांचा हा सोलर ओव्हन सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले. अगदी लहान मुलेही ते सहज वापरू शकतात. मग त्यांनी शेतकर्‍यांसाठी नवीन ओव्हन तयार केला. जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांची पिके सहज सुकवता येतील. त्याचा सोलर ओव्हन अजूनही खूप लोकप्रिय आहे. अनेक नवनवीन शोधानंतर त्या 'द सन क्वीन' म्हणून ओळखल्या जाऊ लागल्‍या. 70 वर्षांपूर्वी (12 डिसेंबर 1952) या दिवशी त्यांना सोसायटी ऑफ वुमन इंजिनिअर्स अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. आज त्यांची 122 वी जयंती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news