Krutika Tulaskar : शेवंता हनीमूनसाठी हिमाचल प्रदेशमध्‍ये… फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Krutika Tulaskar
Krutika Tulaskar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'रात्रीस खेळ चाले ३' फेम मराठी अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar ) काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल देवरुखकरशी विवाह बंधनात अडकली. या विवाह सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. यानंतर कृतिका तिच्या पतासोबत हनीमूनला हिमाचल प्रदेशला पोहोचली आहे. तेथील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar ) तिच्या लग्नानंतर हनीमून आणि देवदर्शनाला हिमाचल प्रदेश, धर्मशाळा आणि अमृतसरला पोहोचली आहे. यावेळचे कृतिकाने डोंगररांगा, सुंदर लोकेशन आणि घेतलेल्या देवाच्या दर्शनाचे फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हिमाचलमध्ये तिने महादेवाचे दर्शन तर अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे.

यातील एका व्हिडिओत तिने पतीसोबत धर्मशाळा येथील विहंगम सुंदर धबधब्याचे दृश्य दाखविले आहे. यावेळी ती मनमुराद आनंद लूटताना खूपच मनमोहक दिसत होती. या फोटोला तिने 'पहाड़ो के साथ', 'परबत के इस पार ?️', 'जय हो जय हो शंकरा #? #जयमहादेव' यासारख्या कॉमेन्टस लिहिल्या आहेत. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

'रात्रीस खेळ चाले ३' (Ratris Khel Chale ३) मालिकेत कृतिकाने मुख्य शेवंताची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, पांडू, अभिराम, कावेरी, सुषमा, इंदुमती या सर्वच पात्रांची भूमिकेने चाहत्यांना भूरळ घातली आहे.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news