सिलिंडरमधून का येतो कुजका वास? यामुळेच वाचतो तुमचा जीव

सिलिंडरमधून का येतो कुजका वास? यामुळेच वाचतो तुमचा जीव
Published on
Updated on

मुंबई : गॅस सिंलिंडर ही घरातील महत्त्वाची गोष्ट. एक दिवस जरी सिलिंडर संपला तरी विनाजेवण, विनाचहा घराबाहेर पडावे लागते. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गॅसचा वास. चुकून कधी गॅस लिक झाला किंवा गॅस सुरू राहिला, तर आपल्याला अतिशय उग्र दर्प सिलिंडरमधून येत असल्याचे जाणवते. मात्र, असा वास गॅसला का येतो आणि त्यामागील विज्ञान काय आहे, याचा विचार आपण कधी केला आहे?

याबाबत घरांमध्ये वापरल्या जाणार्‍या एलपीजी सिलिंडरमध्ये भरलेला गॅस गंधहीन असतो, तरीही त्याची गळती होते तेव्हा एक कुजलेला वास आजूबाजूला पसरतो. असे का होते?

ही दुर्गंधी म्हणजे मरकॅप्टन नावाचे रसायन होय. सुरक्षिततेच्या द़ृष्टीने एलपीजी गॅसमध्ये मरकॅप्टन जोडले जाते. कारण, लिक्विड पेट्रोलियम गॅस हा एक ज्वलनशील वायू आहे. तो आगीच्या संपर्कात आल्यावर विद्युतवेगाने जळू लागतो. अशा स्थितीत गॅस गळती झाली आणि त्याच्या आजूबाजूला कोणी आग लावली, तर मोठी दुर्घटना घडू शकते.

हा अपघात एवढा धोकादायक आहे की, अनेकदा लोकांना जीवही गमवावा लागतो. लोकांना सावध करण्यासाठी, एलपीजीमध्ये मरकॅप्टन जोडले जाते. त्याच्या उग्र वासामुळे गॅसची गळती झाल्याचे पटकन समजते आणि काही क्षणांत आपण सावध होतो. हे रसायन कुजलेला वास सिलिंडरच्या आसपास सोडत असले, तरी त्यामुळेच आतापर्यंत संभाव्य अपघात टळले आहेत.

मरकॅप्टनमुळेच वाचतो जीव

मरकॅप्टनच्या उग्र वासामुळे अनेक मोठे अपघात टळले आहेत. घरामध्ये मरकॅप्टनची दुर्गंधी पसरते तेव्हा लोक सावध होतात आणि गॅस रेग्युलेटर बंद करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news