

पुढारी ऑनलाईन डेस्क : पृथ्वीराज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आणि मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 25 वर्षीय मानुषी ही तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा असलेल्या एका बिझनेसमनला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.
मानुषी एका उद्योगपतीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र याबद्दल अद्याप तिने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मानुषी काही दिवसांपूर्वीच 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट होता. मानुषी ही व्यावसायिक निखिल कामतला डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. निखिल हा 'झेरोधा' या ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीचा सहमालक आहे. गेल्या वर्षभरापासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र रिलेशनशिपबद्दल त्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. काही दिवसांपूर्वीच मानुषी आणि निखिल एकत्र राहू लागलेत, अशीही माहिती समोर येत आहे.
आजवर तिचं नाव कुणासोबतही जोडलं गेलं नव्हतं. दरम्यान मानुषी छिल्लर आणि निखिल कामथ यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं असलं तरी दोघांकडूनही या वृत्तावर अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेलं नाही. सध्या, मानुषीला तिच्या करीअरवर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे तिला तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मीडियासमोर खुलासा करायचा नसल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच मानुषी आणि निखिल यांच्या कुटुंबियांमध्येही जवळचे संबंध आहेत. दोन्ही कुटुंबीयांनादेखील त्यांच्या नात्याबद्दल तसंच त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा रंगू नये अशी इच्छा आहे.
कोण निखिल कामत?
निखिल कामत हा जेरोधा या इनव्हेस्टमेंट कंपनीचा को फाउंडर आहे. त्याचं वय 35 वर्ष असून अनेक तरुणांसाठी तो आयकॉन आहे. त्यानं स्वत:च्या मेहनतीनं करोडोंचा बिझनेस सुरू केला आहे. मानुषीच्या आधी निखिल अमांडा परवानकारा हिच्याबरोबर लग्न केलं होतं. 2019मध्ये इटलीच्या फ्लोरेंस इथे त्यांनी लग्नं केलं. पण एक वर्षाच्या आता त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2021 पासून निखिलनं मानुषीबरोबर त्याचं नवं आयुष्य सुरू केलं.
मानुषीने 2017 मध्ये 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला होता. तेव्हापासून ती प्रकाशझोतात आली, मात्र या पाच वर्षांत तिच्या डेटिंगच्या चर्चा कधीच नव्हत्या. या वर्षी तिने अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने संयोगिताची भूमिका साकारली होती.
हेही वाचा…