Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : जरांगेंची प्रकृती खालावली; अंतरवालीत वातावरण भावूक

Published on

वडीगोद्री,पुढारी वृत्तसेवा मनोज जरांगे Manoj Jarange Patil यांची प्रकृती उपोषणाच्या पाचव्या दिवशी आणखी खालावली आहे. यामुळे अंतरवाली सराटीत आंदोलक कार्यकर्ते येण्यास प्रारंभ झाला आहे. उपोषणस्थळाचे वातावरण भावूक बनले आहे. जरांगे यांची ढासळत चाललेली प्रकृती पाहून अनेक महिला व कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रु येत असून, जरांगे यांनी किमान पाणी तरी घ्यावे असा आग्रह समाजबांधव करीत आहेत.

आज (बुधवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या नाकातून अचानक रक्तस्त्राव झाला. मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे. त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती कळताच आंदोलक आंतरवालीकडे येत आहेत. उपोषण मंडपात कार्यकर्ते शांत बसले असून, सगळे वातावारण गंभीर बनले आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे.

सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत चालली आहे. जरांगे यांची तब्येत खालावली असून, उपचाराला ते नकार देत आहेत. नाकातून रक्त आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आज सकाळी ९ वाजता जिल्हा आरोग्यपथक व्यासपीठावर दाखल झाले. मात्र तपासणी करून देण्यास त्यांनी नकार दिला. फक्त बीपी तपासणी तरी करून देण्याची विनंती आरोग्य पथकातील डॉक्टरांनी जरांगे पाटील यांना केली, मात्र त्यांनी त्यास ही विरोध केला.

आरोग्य पथकातील डॉक्टर तपासणीसाठी आले असता तपासनीस ते नकार देत आहेत. आरक्षण हाच माझ्यासाठी उपचार असल्याचे ते म्हणाले.

नाकातून रक्त वेगवेगळया कारणाने येवू शकत. नाकातून रक्त येणे हे गंभीर लक्षण आहे. आम्ही त्यांना आरोग्य तपासणी करून द्यावी अशी विनंती केली, मात्र त्यांनी तपासणी करू दिली नाही असे आरोग्य पथकातील डॉक्टरांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे.
ते १० फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सातत्याने असणारे त्यांचे खासगी डॉ. रमेश तारख हे भेटण्यासाठी आले असता त्यांना ही आरोग्य तपासणीसाठी जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. दरम्यान जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात आज (बुधवार) अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news