बघता बघता गणपती बाप्पांच आगमन अगदी जवळ येऊन ठेपलं आहे. घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पांची सरबराई कशी करायची या तयारीत गुंतला आहे. गणपती बाप्पांचं आगमन म्हणजे सकाळ संध्याकाळ आणि नैवेद्याच्या विविध पदार्थांची रेलचेल. पण तुम्हाला माहिती आहे का मोदकांप्रमाणेच बाप्पाला आवडणारा नैवेद्य म्हणजे पंचखाद्य. बनवण्यास अत्यंत सोपा आणि पारंपरिक असा हा पंचखाद्याचा हा प्रकार आहे. पाहुयात कशी आहे याची रेसिपी.
साहित्य :
काजू : 1 कप
सुकं खोबरं : 1 कप
चणा डाळ : 1 कप
शेंगदाणे : 1 कप
गूळ : 1 कप
वेलची पावडर : अर्धा टी स्पून
लाहया : 3-4 कप
गरजेनुसार पाणी
कृती :
कढई गॅसवर ठेवून गरम करून घ्यावी. त्यात सर्वप्रथम काजू टाकून भाजून घ्यावेत.
त्यानंतर सुकं खोबरं, चणा डाळ, शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यावेत.
दुसऱ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यात गूळ टाकावा. यात किसलेला गूळ घालून त्याचा एकतारी पाक करून घ्यावा.
या पाकात त्यात भाजून घेतलेले सर्व जिन्नस आणि वेलचीपूड टाकावी. शेवटी लाहया घालून योग्य प्रकारे मिसळून घ्यावे.
पंचखाद्य हा नैवेद्याचा प्रकार प्रामुख्याने कोकणात जास्त आढळतो.