नगर: पारनेर बाजार समितीत महाविकास आघाडीची मुसंडी, भाजपच्या सुजय विखे गटाचा दारुण पराभव

नगर: पारनेर बाजार समितीत महाविकास आघाडीची मुसंडी, भाजपच्या सुजय विखे गटाचा दारुण पराभव
Published on
Updated on

शशिकांत भालेकर

पारनेर (नगर): पारनेर बाजार समिती निवडणूक खासदार डॉ.सुजय विखे, आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीला आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीची झालर होती. त्यामुळे कधी नव्हे एवढी रस्सीखेच बाजार समिती निवडणुकीत पाहायला मिळाली. महाविकास आघाडी विरोधात भाजप अशा दुरंगी लढतीत महाविकास आघाडीचा 18 -0 ने विजय झाला. खासदार सुजय विखे नेतृत्वातील भाजपच्या पॅनलचा दारून पराभव झाला. बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.

महाविकास आघाडीने बाजार समिती निवडणुकीमध्ये मोठी बाजी मारली असून आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांची झालेली युती ही निर्णयाक ठरली आहे. खासदार विखे यांना पारनेर तालुक्यात रोखण्यात या दोघांना यश आले आहे.

खासदार सुजय विखे यांनी लक्ष घालत पॅनल उभा करत पॅनलचे नेतृत्व स्वतः केले होते. यंत्रणा कामाला लागली. परंतु, आजी माजी आमदार एकत्र आल्यामुळे व आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानची यंत्रणा निर्णायक ठरल्याने भाजपचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीचे सोसायटी मतदारसंघासह ग्रामपंचायत व व्यापारी हमाल मापाडी या सर्वच जागेवरील उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. सहकार क्षेत्रातील तालुक्यातील ही एकमेव संस्था आहे. बाजार समितीवर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. यावेळी महाविकास आघाडी एकत्र येत मोठ्या फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीनंतर तालुक्यात मंथन करण्याची वेळ भाजपवर आली आहे.

शेतकरी विकास पॅनल (मविआ) विजयी उमेदवार पुढील प्रमाणे

सोसायटी मतदार संघ

खोडदे आबासाहेब भाऊसाहेब- 757 मते
गायकवाड प्रशांत संभाजीराव- 814 मते
तरटे बाबासाहेब भिमाजी- 738 मते
भोसले रामदास हनुमंत – 768 मते
सालके संदीप लक्ष्मण- 733 मते
सावंत अशोक साहेबराव- 694 मते
सुपेकर किसन पंढरीनाथ- 679 मते
पठारे पद्मजा श्रीकांत- 923 मते
रोकडे मेघा श्रीरंग- 784 मते
बेलकर गंगाराम तुकाराम- 829 मते
नरे बाबासाहेब वामनराव- 789 मते

ग्रामपंचायत मतदार संघ

पवार विजय किसन- 596 मते
रासकर किसन सबाजी- 605 मते
नगरे शंकर ताराचंद- 592 मते
शिर्के भाऊसाहेब तुकाराम- 506 मते

व्यापारी आडते मतदारसंघ

कटारिया अशोकलाल माधवलाल- 338 मते
भळगट चंदन रमेश- 389 मते

हमाल मापाडी मतदारसंघ

चव्हाण तुकाराम दत्तू- मते 65 मते

लोकसभेसाठी आमदार निलेश लंके यांचे नाव चर्चेत आल्यानंतर खासदार सुजय विखे यांनी पारनेर मतदारसंघात लक्ष घातले व बाजार समितीसाठी भाजपचा पॅनल तयार केला. भाजपने निवडणुकीत जोरदार प्रचार केला. मात्र, आमदार निलेश लंके व विजय औटी यांच्या एकत्र येण्याने भाजपचा प्रयत्न निरर्थक ठरला.

पारनेर भाजपची गटबाजी

महाविकास आघाडीने तालुक्यात एकत्र येत मोठा विजय मिळवला. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली गटबाजी ही या निवडणुकीत देखील दिसून आली. आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सक्रियपणे नियोजन करत असताना भाजपच्या गटातटातील राजकारणामुळे त्यांना विजयापासून दूर राहावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news