

Ajit Pawar Baramati Plane Crash: बारामतीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत केवळ त्यांचाच नव्हे तर विमानाच्या पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला. विमानातील क्रूमध्ये कॅप्टन सुमित कापूक, विमानाची को-पायलट (दुसरी पायलट) कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवारांचे सहकारी विदीप जाधव आणि पिंकी माळी यांचेही निधन झाले आहे.
आज सकाळी मुंबईहून निघालेले लीयरजेट हे खाजगी विमान बारामतीत उतरण्याच्या प्रयत्नात असताना दाट धुक्यामुळे त्यावरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत कोणीच वाचले नाही.
दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या को-पायलट शांभवी पाठक या फक्त 25 वर्षांच्या होत्या. ग्वालियरमधील वायु सेना बाल भारती स्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठातून 'एरोनॉटिक्स' (वैमानिकी) या विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी न्यूझीलंडमधील एका प्रसिद्ध व्यावसायिक पायलट अकादमीत प्रशिक्षण घेतले.
2019 पर्यंत त्यांनी भारत आणि न्यूझीलंडचे कमर्शियल पायलट लायसन्स मिळवले होते. पायलट होण्याबरोबरच त्या इतर उमेदवार पायलट्सना प्रशिक्षण देण्याचे कामही मध्य प्रदेश फ्लायंग क्लबमध्ये करत होत्या.
अजित पवारांसोबत असलेले खासगी राखीव पोलीस अधिकारी (PSO) विदित जाधव हे 2009 बॅचचे मुंबई पोलीस विभागातील शिपाई होते. पिंकी माळी या शिवसेनेच्या माहिम-वरळी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या कन्या होत्या.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांची नावे:
अजित पवार - उपमुख्यमंत्री
विदिप जाधव - राखीव पोलीस अधिकारी
कॅप्टन सुमित कपूर - पायलट
कॅप्टन शांभवी पाठक - पायलट
पिंकी माळी - फ्लाइट अटेंडंट
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य बारामतीला रवाना झाले आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत आहेत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह बारामतीला रवाना झाले आहेत.