

तीन दिवसांत केरळात येण्याची शक्यता
धो धो पाऊस देत वर्णी दिली
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार
पुणे : यंदा मान्सून प्रचंड वेगाने प्रवास करीत तब्बल दहा दिवस आधीच अंदमान बेटावर 13 मे रोजी दाखल झाला. महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देत त्याने दाखल झाल्याची वर्णी दिली.आता तो अवघ्या तीन दिवसांत केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
नैऋत्य मान्सून मंगळवारी सकाळीच अंदमान निकोबार बेटांसह दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झाला.दरवर्षी मान्सून अंदमानात 18 ते 22 मे दरम्यान येतो मागच्या वर्षी तो अंदमानात 22 मे रोजी आला होता.तर केरळ मध्ये 5 जून तर महारा÷ट्रात 10 जून रोजी आला होता.
पुढील तीन दिवसांत तो कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे.त्यामुळे तळकोकणात तो त्या पुढील पाच दिवसांत म्हणजे 25 ते 27 मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सकाळीच 8 ते 9 च्या दरम्यान मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर धडकला आणि संपूर्ण देशात आनंदलहरी उमटल्या कारण देशातील बहुतांश भागांत जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसला.महाराष्ट्रातील बहुतांश भागात मंगळवारी सकाळी 11.30 ते 12.30 असा एक तास धो धो पाऊस झाला.आता राज्यात 19 मे पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पुणे 72,
नाशिक 53
कोल्हापूर 52
जळगाव 52
जालना 54
कर्जंत 39