बुलडाणा ; पुढारी वृत्तसेवा : स्वराज्य प्रेरणा राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची ४२४ वा जयंती आज १२ जानेवारीला सर्वत्र साजरी होत आहे. सिंदखेडराजा येथे राजे लखूजीराव जाधव यांच्या राजवाडास्थित जिजाऊ जन्मस्थळावर परंपरेप्रमाणे प्रातःकाली जन्मोत्सवाला सुरूवात झाली. पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी जिजाऊ पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी जाधव घराण्याचे 13 वे वंशजही प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी सिंदखेडराजा येथील जन्मस्थळ परिसर दणाणून गेला. कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर ५० नागरिकांच्या उपस्थितीत जिजाऊ जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा साजरा झाला. तत्पूर्वी पूर्वसंध्येला राजवाडा परिसरात आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.