नागपूर : वाहतुकीचे नियम पाळा आणि बक्षीस मिळवा

नागपूर : वाहतुकीचे नियम पाळा आणि बक्षीस मिळवा

नागपूर : ट्राफिक नियमांचे पालन न करणाऱ्यांना नेहमीच दंड केला जातो, पण नियमांचे पालन करून गाडी चालवणाऱ्या चालकांना काय ? वाहतूक नियम पाळणाऱ्यांना आता बक्षीस मिळणार आहे. १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या विज्ञान प्रदर्शनात याबाबत माहिती देण्यात येत आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालय व नागपूर महापालिका यांच्या सहकार्यातून एका खासगी कंपनीद्वारे नागपूर शहरात प्रायोगिक स्तरावर पुढील महिन्यात हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले. ट्राफिक रिवार्ड याद्वारे नोंदणी करणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या वाहनावर लावण्यासाठी एक रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटीफिकेशन डिव्हाईस घरपोच मिळेल. या डिव्हाईसची फ्रीक्वेन्सी कॅच करण्यासाठी नागपुरातील वेस्ट हाय कोर्ट रोड ते जपानी गार्डन रोड या मार्गावर प्रायोगिक स्तरावर १० सिग्नलवर सेन्सर लावण्यात आले आहेत. हे सेन्सर सिंग्नलसोबत जोडण्यात आले असून आपली गाडी लाल, पिवळ्या व हिरव्या सिग्नलचे पालन करते का याची तपासणी ते करणार आहेत. नियमाचे पालन करणाऱ्याा वाहनचालकाच्या खात्यात प्रत्येक सिग्नलवर १० रिवार्ड पॉईंट जमा करण्यात येतील.. आपल्याला विविध कंपन्यांची उत्पादने खरेदी करताना सवलत मिळविण्यासाठी करता येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news