भंडारा: विजेच्या धक्‍क्‍याने तरुणाचा मृत्यू, विहिरीवरील मोटार चालू करताना दुर्घटना

भंडारा: विजेच्या धक्‍क्‍याने तरुणाचा मृत्यू,  विहिरीवरील मोटार चालू करताना दुर्घटना
Published on
Updated on

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : विहिरीवरील विद्युत मोटार चालू करत असताना अचानक स्विच बोर्डात करंट उतरल्याने विजेचा जोरदार धक्‍क्‍याने  तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. ही घटना तुमसर तालुक्यातील आसलपाणी येथे आज ( दि. २८) सकाळी घडली. गितेश (जितू) गणराज श्रीवारे (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे.

विहिरीतील विद्युत मोटार सुरू होत नव्‍हती.  गितेश त्‍याने माेटार सुरु करण्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळी अचानक स्वीच बोर्डात करंट उतरला.  विजेचा जोरदार धक्‍क्‍याने  गितेश खाली कोसळला. घरच्यांनी वीज प्रवाह बंद करून गितेशला सावरण्याचा प्रयत्न केला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या त्‍याला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news