Umarkhed Panchayat Samiti | उमरखेड पंचायत समितीत अनागोंदी; आमदार वानखेडेंकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

४६ कर्मचाऱ्यांच्या मस्टरवर केवळ ८ ते १० जण उपस्थित; विनापरवानगी गैरहजर कर्मचाऱ्यांचे वेतन कपातीचे निर्देश
MLA Wankhede Inspection Umarkhed Panchayat Samiti
आमदारांनी गटविकास अधिकारी किरण कोळपे यांना धारेवर धरत विनापरवानगी गैरहजर कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याचे निर्देश दिले Pudhari
Published on: 
Updated on: 

MLA Wankhede Inspection Umarkhed Panchayat Samiti

उमरखेड : उमरखेड पंचायत समितीतील कर्मचारी उपस्थिती आणि प्रशासकीय कामकाजातील अनियमितता आमदार किसनराव वानखेडे यांच्या पाहणीत समोर आली. उपस्थिती पुस्तिकेवर ४६ कर्मचाऱ्यांची नोंद असताना प्रत्यक्ष कार्यालयात केवळ ८ ते १० कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळले. या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदारांनी गटविकास अधिकारी किरण कोळपे यांना धारेवर धरत विनापरवानगी गैरहजर कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याचे निर्देश दिले.

सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा आणि कार्यालयीन कामकाजात शिस्त राहावी, या उद्देशाने आमदार वानखेडे यांनी पंचायत समितीला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थिती पुस्तिकेची तपासणी करून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची आणि कामकाजाची माहिती घेतली. काही कर्मचारी निवडणूक कामाच्या कारणास्तव गैरहजर असल्याचे सांगण्यात आले, तर काहींनी रजेचे अर्ज दिल्याचे स्पष्ट झाले. मात्र, सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी नसताना कर्मचारी गैरहजर कसे राहतात, असा सवाल आमदारांनी उपस्थित केला.

MLA Wankhede Inspection Umarkhed Panchayat Samiti
Yavatmal Bribe | शेतकऱ्याकडून १ हजाराची लाच घेताना महिला वनरक्षक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

पंचायत समितीतील काही कर्मचारी जिल्हा परिषद यवतमाळ तसेच अन्य पंचायत समित्यांमध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याचेही निदर्शनास आले. संबंधित कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली. प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात किंवा संबंधित ठिकाणी अधिकृत बदली करावी, अशा सूचनाही आमदारांनी दिल्या.

घरकुल योजना, बांधकामाची देयके आणि इतर शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात यावे लागते. कर्मचारी अनुपस्थित असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याबद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली. अपूर्ण घरकुलांची कामे आणि प्रलंबित देयकांचा आढावा घेऊन लाभार्थ्यांची बिले तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले.

शासकीय कार्यालये जनतेच्या सेवेसाठी असून, कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहून जबाबदारीने काम करावे, असे आमदार वानखेडे यांनी स्पष्ट केले. या वेळी विस्तार अधिकारी अमोल चव्हाण उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.