Yavatmal Bribe | शेतकऱ्याकडून १ हजाराची लाच घेताना महिला वनरक्षक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

हिवरी वनपरिक्षेत्रीय अधिकारी कार्यालयात यवतमाळ लाचलुचपत विभागाच्या पथकाची कारवाई
 Bribery Case
Bribery CasePudhari
Published on: 
Updated on: 

Yavatmal Hivri Forest Range Bribery Case

यवतमाळ : वन्यप्राण्यांकडून झालेली  पिकांची नुकसानीची भरपाई देण्यासाठी एक हजारांची लाच मागणार्‍या महिला वनरक्षकास अटक करण्यात आली. ही कारवाई तालुक्यातील हिवरी वनपरिक्षेत्रीय अधिकारी कार्यालयात बुधवारी दुपारी यवतमाळ लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली. 

कल्पना रूपसिंग राठोड (वय 30), असे लाचखोर वनरक्षक महिलेचे नाव आहे. तालुक्यातील हिवरी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत तक्रारदार शेतकर्‍याची शेती आहे. त्या शेतकर्‍याच्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले आहे. नुकसानग्रस्त पिकांची शासनाकडून भरपाई देण्यात येणार होती. यासाठी शेतकर्‍याने स्वतःचा आणि त्याच्या पत्नीच्या नावाने हिवरी वनपरिक्षेत्र कार्यालयात दोन अर्ज दाखल केले होते.

 Bribery Case
Yavatmal Crime : रात्रीच्या अंधारात 'पांढऱ्या सोन्यावर' डल्ला; नेर तालुक्यात २५ क्विंटल कापूस चोरीला

नुकसानीचा लाभ अदा करण्यासाठी वनरक्षक महिला कल्पना राठोड यांनी शेतकर्‍याला प्रत्येकी पाचशेप्रमाणे दोन अर्जाचे एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकारामुळे संतापलेल्या शेतकर्‍याने यवतमाळ लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी केली होती.

बुधवारी दुपारी एक हजार रुपये स्वीकारताना आरोपी वनरक्षक महिलेला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज आरके, स्वप्नील निराळे, जयंत ब्राम्हणकर, अतुल मत्ते, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, आकाश सहारे, भागवत पाटील, मनिषा राजूरकर, सरिता राठोड, अतुल नागमोते आदींनी पार पाडली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news