Yavatmal Crime | कैचीने जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरगड येथील घटना
 Crime News
Crime Newsfile photo
Published on: 
Updated on: 

Yavatmal Savargad Attack Case

यवतमाळ : पूर्व वैमनस्यातून एकावर कैचीच्या पात्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश-1 एस. यू. बघेले यांनी या प्रकरणाचा निकाल दिला.

भारत राजाराम नागमोते (वय 35, रा. सावरगड, ता. यवतमाळ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सखाराम शंकर मेटकर असे जखमीचे नाव आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरगड येथे सुमारास ही घटना घडली होती.

 Crime News
Yavatmal crime news | सहा किलो गांजासह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

पावसामुळे घरचे बैल शेजार्‍यांच्या कोठ्यात बांधण्यासाठी जात असताना, आरोपी भारतने पूर्व वैमनस्यातून भारतवर कैचीच्या पात्याने अचानक जीवघेणा हल्ला केला. यात त्याला पोटावर, मानेवर व हातावर गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर फिर्यादीची पत्नी निर्मला सखाराम मेटकर यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय शिरभाते यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

यात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 09 साक्षीदार तपासण्यात आले. तीन साक्षीदार फितूर झाले तरी फिर्यादी, जखमी, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांचे पुरावे ग्राह धरून न्यायालयाने आरोपी भारत याला दहा वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त 1 वर्ष सश्रम कारावास, तसेच इतर कलमांनुसार शिक्षा सुनावली आहे.

 Crime News
Yavatmal Crime News : ५ हजारांची लाच घेताना 'भूमीअभिलेख'चे उपअधीक्षक अन् भूमापक जाळ्यात, यवतमाळमध्ये 'एसीबी'चा दणका

सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. मंगेश गंगलवार यांनी युक्तिवाद केला. त्यांना पोलिस स्टेशन यवतमाळ ग्रामीणच्या पैरवी अधिकारी, महिला हेड कॉन्स्टेबल शीतल उजवे, पोलिस निरीक्षक संजय शिरभाते आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण देविदास मानकर यांचे सहकार्य लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news