Yavatmal Crime News : ५ हजारांची लाच घेताना 'भूमीअभिलेख'चे उपअधीक्षक अन् भूमापक जाळ्यात, यवतमाळमध्ये 'एसीबी'चा दणका

bribe news
Published on
Updated on

यवतमाळ : बक्षीसपत्राद्वारे दिलेल्या मालमत्तेच्या फेरफार करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या भूमीअभिलेखच्या उपअधिक्षकासह भूमापकास रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिग्रस येथे आज मंगळवारी (दि. ३) ही कारवाई केली.

उपअधीक्षक सखाराम नरसिंग पवार (वय ४९) वर्षे व नझुल परिरक्षण भूमापक आशिष काशिनाथ शेलोकर (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या प्रकरणात महिला तक्रारदार यांच्या सासऱ्यांनी त्यांची मालकीची मालमत्ता तक्रारदार व त्यांच्या पतीस बक्षीसपत्राद्वारे दिली होती.

सदर बक्षीसपत्रानुसार मालमत्तेचा फेरफार करून घेण्यासाठी तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्रे दिग्रस भूमीअभिलेख कार्यालयात आशिष शेलोकर यांच्याकडे दिली. त्यांनी उपअधिक्षक सखाराम पवार यांची भेट घेण्यास सांगितले. पवार यांची भेट घेतली असता त्यांनी ५ हजार रुपयांची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने पथकाने मंगळवारी पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान आशिष शेलोकर यांनी स्वतःसाठी व उपअधिक्षक यांच्यासाठी एकूण ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर आयोजित सापळा कारवाईदरम्यान आरोपी शेलोकर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपये स्वीकारले.

यापैकी अडीच हजार रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित अडीच हजार रुपये उपअधिक्षक सखाराम पवार यांना देताना दोन्ही आरोपींना उपअधिक्षकांच्या कक्षात रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी दिग्रस पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news