Yavatmal Crime | अल्पवयीन मुलगा- मुलीला घरात भेटावयास बोलावले; वडिलांकडून मुलीचा गळा आवळून खून

यवतमाळ तालुक्यातील फुबगाव येथील घटनेने खळबळ
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Father Kills Daughter Yavatmal

यवतमाळ : रागाच्या भरात वडिलानेच आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 13) दुपारी चार वाजताच्या तालुक्यातील फुबगाव येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने बुधवारी (दि.15) तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

मयूरी विजय राऊत (वय 17) असे मृत मुलीचे नाव आहे. तर विजय केशवराव राऊत (वय 45) असे आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी आरोपी पत्नीसह शेतावर गेला होता. मुलगी एकटीच घरी होती. आरोपी दुपारी एकटाच घरी परतला तेव्हा मुलगी दारात उभी होती. आणि आतमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी असल्याचे त्याला दिसले. आरोपीला पाहताच त्यांनी पळ काढला.

Crime News
Yavatmal News : पुसदमध्ये निवडणूक कामात हलगर्जीपणा; मतदार नोंदणीच्या कामात 'BLO' सापडला मद्यधुंद अवस्थेत

या प्रकाराबाबत चौकशी केली तेव्हा, मुलीने त्यांना भेटायला आपल्या घरची खोली दिल्याचे समजल्यानंतर त्याचा पारा चढला. रागाच्या भरात त्याने मुलीचा गळा दाबला. त्यावेळी तिचा श्वास रोखला गेल्याने मृत्यू झाला. त्यानंतर आपले बिंग फुटू नये म्हणून त्यांनी मृतदेह गोठ्यात नेऊन दोरीने लटकवून ठेवला आणि मुलीने गळफास घेतल्याचा बनाव केला.

परंतु, मृतदेहाच्या शवविच्छेदन यादरम्यान वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेला अभिप्राय व पोलिस तपासात ही घटना उघडकीस आली. त्यानंतर छाया विजय राऊत (वयच 40) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे, ठाणेदार सुनील गोपीनवार, पीएसआय नीलेश तारक, पीएसआय संभाजी हिवाळे व पोलिस कर्मचार्‍यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news