Yavatmal Gram Sevak Assault | ग्रामपंचायतीमध्ये शिरून ग्रामसेवकाला मारहाण करणे भोवली; आरोपीस कारावासाची शिक्षा

आकोली (बु.) येथील ग्रामपंचायत कार्यालयातील घटना
Court
CourtPudhari
Published on: 
Updated on: 

Pandharkawada Court Verdict

यवतमाळ : ग्रामपंचायतमध्ये  शिरून ग्रामसेवकाला मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि कार्यालयातील मालमत्तेची तोडफोड करणे आदी दोष सिध्द झाल्याने आरोपीला पाच महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. ए. कोठारी यांच्या न्यायालयाने दोषारोप तडजोड प्रक्रियेद्वारे निकाली काढले आहे.

रमेश मारोती उर्फ तुळशिराम येंबडवार (वय 42, रा. गोपाळपूर, ता. केळापूर असे शिक्षा ठोठवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आकोली (बु.) येथील ग्रामपंचायत कार्यालयात 23 ऑगस्ट 2018 रोजी ग्रामसेवक प्रभाकर बापुराव फुलभोगे व इतर कर्मचारी शासकीय कामकाज करत होते.

दरम्यान, आरोपी रमेश येंबडवार याने कार्यालयात शिरून ग्रामसभा का घेतली नाही? असा जाब विचारत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कर्मचार्‍यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने ग्रामसेवकाचा गळा आवळून त्यांना मारहाण केली.  कार्यालयाच्या टेबलावरील महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून देत टेबलावर बसवलेली काच फोडून नुकसान केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

घटनेनंतर ग्रामसेवक फुलभोग यांनी पांढरकवडा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक भरत चपाईतकर यांनी तपास पूर्ण करून केळापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले.

त्यानंतर सोमवारी (दि. १९) सुनावणी घेण्यात आली. यात न्यायालयाने फिर्यादीसह एकूण चार साक्षीदारांची तपासणी झाली. दीर्घकाळ चालणार्‍या न्यायालयीन प्रक्रियेत वेळ वाचवण्यासाठी व शिक्षेत सवलत मिळण्यासाठी आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन दोषारोप तडजोड अर्ज सादर केला. त्यामुळे आरोपीला पाच महिन्यांचा कारावास आणि 800 रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news