Yavatmal News | स्वप्नांचा अवेळी शेवट: स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने तरुण अभियंत्याने जीवन संपवले

तरुणाने अशाप्रकारे जीवनयात्रा संपवल्याने शैक्षणिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे
Life Ended News
Life Ended News
Published on
Updated on

यवतमाळ : स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहात यश हुलकावणी देत असल्याने आलेल्या नैराश्यातून एका तरुण अभियंत्याने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उमरखेड येथे घडली आहे. अभियांत्रिकीची पदवी घेऊनही गेल्या तीन वर्षांपासून नशिबाची साथ मिळत नसल्याने व्यथित झालेल्या या तरुणाने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

मूळचा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथील रहिवासी असलेला सचिन अशोक शिंदे (वय ३४) हा तरुण मागील अनेक वर्षांपासून आपल्या आईसोबत उमरखेडमधील दयानंद कॉलनी येथे वास्तव्यास होता. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते, मात्र प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो गेल्या तीन वर्षांपासून एमपीएससी (MPSC) परीक्षेची कसून तयारी करत होता.

नैराश्यातून टोकाचे पाऊल

सततचा अभ्यास आणि मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसल्याने सचिन गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. याच विवंचनेतून सोमवारी (दि.२३) सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरीच गळफास लावून आपले जीवन संपवले. मंगळवारी (दि.२४) सकाळी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एका होतकरू तरुणाने अशाप्रकारे आपली जीवनयात्रा संपवल्याने शैक्षणिक वर्तुळातून आणि परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news