Yavatmal Accident | भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार; एकजण गंभीर जखमी

नेर तालुक्यातील मुकिंदपूर गावाजवळील वळणावर अपघात
Ner Car Bike Crash
Ner Car Bike Crash Pudhari
Published on
Updated on

Ner Car Bike Crash

यवतमाळ : भरधाव कारची धडक लागून दुचाकीवरील दोघे जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. नेर तालुक्यातील मुकिंदपूर गावाजवळील वळणावर रविवारी दुपारी ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेर तालुक्यातील वाई इजारा येथील विनोद चिंतामण शेंडे (वय 43), नीलेश कमलदास शेंडे (वय 25) व दर्शन बंडू सोनटक्के (वय 35) हे तिघे दुचाकीने (एमएच. 29 सीएच 6714) शेंद्री डोलारीमार्गे दारव्हा रोडने जात होते. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास मुकिंदपूर गावाजवळील वळणावर समोरून आलेल्या एमएच 29 सीजे 8603 क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

Ner Car Bike Crash
Yavatmal Accident | भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी अपघातात जखमी

या अपघातात विनोद शेंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नीलेश शेंडे याला रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. दर्शन सोनटक्के हे गंभीर जखमी असून नेर येथील शासकीय रुग्णालयामधून पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दिगांबर चिंतामण शेंडे यांनी नेर पोलिसात दिलेल्या तक्रारीत चारचाकी वाहन चालक वैभव राजाजी कुरकुटे याने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडविल्याचे नमूद केले आहे. या घटनेमुळे वाई इजारा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news