Yavatmal Accident | भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी अपघातात जखमी

यवतमाळच्या गोधनी बायपासवर ट्रकची गाडीला जोराची धडक
  Accident News
Accident Newspudhari photo
Published on
Updated on

MLA Raju Todsam Wife Injured Godhani Bypass Accident

यवतमाळ : आर्णी केळापूर मतदारसंघाचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया तोडसाम यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. यवतमाळच्या गोधनी बायपास वर हा अपघात झाला. यात एका ट्रकची स्कॉर्पिओ गाडीला जोराची धडक झाली.

या अपघातात प्रिया तोडसाम यांच्या पायाला व डोक्याला दुखापत झाली असून वाहन चालकाच्या कमरेला मार लागला आहे. गोधनी बायपास वर वारंवार अपघात घडत असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणने येथे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news