Yavatmal News | केस बेअरिंगमध्ये अडकून आकाश पाळण्यात बसलेली महिला जखमी

महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील घटना
Ferris Wheel Accident Woman Injured
Ferris Wheel Accident Woman Injured AI
Published on
Updated on

Ferris Wheel Accident Woman Injured

यवतमाळ : आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेचे केस अचानक पाळण्याच्या बेअरिंगमध्ये अडकले. पाळणा सुरू असल्याने काही क्षणांतच केस ओढले गेल्याने त्यांच्या डोक्यावरील केसांसह मांस निघाल्याने ती जखमी झाली. ही थरारक घटना महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे शुक्रवारी दुपारी घडली. बाली मारोती टाळीकोटे (वय २५)  असे जखमी महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी तान्हा पोळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही एकदिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पुणेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी तसेच यात्रेचा आनंद लुटण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक दाखल झाले होते. विशेषतः महिलांची यात्रेत मोठी गर्दी होती. मात्र, दुपारी घडलेल्या दुर्घटनेने यात्रेच्या आनंदावर विरजण पडले.

Ferris Wheel Accident Woman Injured
Yavatmal News : अंत्यविधीवेळी स्मशानभूमीत मधमाशांचा हल्ला! नागरिकांची पळापळ; अनेक जण जखमी

या घटनेमुळे यात्रास्थळी एकच खळबळ उडाली. घटना घडताच उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे व जमादार सुहास कायटे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने पाळणा थांबविला. जखमी महिलेला त्वरित बाहेर काढून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यानंतर उपचारासाठी त्यांना पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news