Yavatmal Crime : रात्रीच्या अंधारात 'पांढऱ्या सोन्यावर' डल्ला; नेर तालुक्यात २५ क्विंटल कापूस चोरीला

Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

यवतमाळ : नेर तालुक्यात कापूस चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी पाच शेतकऱ्यांचा तब्बल २५ ते ३० क्विंटल कापूस चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

धनंजय ठाकरे, राजू साळुंखे, कवीश उगवेकर, संदीप बहुतकर आणि हेमंत राऊत यांच्या शेतातील कापूस चोरीला गेल्याचे संयुक्त तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सुमारे तीन लाख रुपयांचा कापूस चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शेतातील कापूस चोरला जात आहे.

आधीच शेतीचा वाढता खर्च, निसर्गाची अनिश्चितता आणि बाजारभावाची चिंता यामुळे शेतकरी त्रस्त असताना, कापूस चोरीच्या घटनांनी त्यांच्या अडचणीत आणखी भर घातली आहे. कापूस चोरीच्या घटनांची तातडीने चौकशी करावी, संबंधित शेतांची पाहणी करून पंचनामा करावा, चोरी गेलेल्या कापसाचे नेमके प्रमाण निश्चित करून आर्थिक नुकसानीचा आढावा घ्यावा आणि चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांनाही निवेदन देण्यात आल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news