Yavatmal Child Death | यवतमाळ : कारमध्ये अडकलेल्या चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू

घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे ही हृदयद्रावक घटना
Child death
Child deathPudhari
Published on
Updated on

Yavatmal Trapped Child Car Death

यवतमाळ : घरासमोर खेळत असताना शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये गेलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. बराच वेळ कारमध्ये अडकून राहिल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  गुरुवारी (दि. 17) दुपारी घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे ही हृदयद्रावक घटना घडली.

अंश सुरज केळझरकर (वय ४) हा घराबाहेर खेळत होता. खेळता खेळता तो शेजारी लावलेल्या कारमध्ये गेला. मात्र, कारमधून बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्याने तो आतच अडकून पडला. बराच वेळ तो कारमध्ये असल्याची कल्पना कुटुंबीयांना आली नाही. अंश शेजारी खेळत असेल, असे समजल्याने त्याचा तत्काळ शोध घेण्यात आला नाही. काही वेळाने अंशची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी तो कारमध्ये बेशुद्ध आढळून आला.

Child death
Yavatmal News | यवतमाळ : देयक काढण्यात दिरंगाई भोवली ; लिपिक निलंबित

बाहेरील वातावरणात कडाक्याचे ऊन असल्याने कारमध्ये अडकलेल्या अंशची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्याला तातडीने घाटंजी ग्रामीण रुग्णालय, घाटंजी येथे नेण्यात आले. तेथे केवळ तपासणी करून तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

सामाजिक कार्यकर्ते मुज्जू पटेल यांच्या रुग्णवाहिकेतून अंशला पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविले. मात्र, यवतमाळ येथील बालरोग तज्ज्ञांनी त्याची तपासणी केली असता, त्याला मृत घोषित केले.मुलाचे हातपाय कडक आले होते, तर डोळ्याच्या बाहुल्याही सुकल्या होत्या, यावरून अंशचा दीड तासापूर्वीच मृत्यू झाला असवा, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news