Yavatmal News | यवतमाळ : देयक काढण्यात दिरंगाई भोवली ; लिपिक निलंबित

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला जिल्हाधिकारी विकास मीना यांची अचानक भेट!
suspended
suspendedPudhari News Network
Published on
Updated on

यवतमाळ: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला आज मंगळवारी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट दिली. दोनशेहून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचे उघडकीस आल्याने संबधित लिपिकास तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे निर्देश दिले.

या भेटीत त्यांनी कार्यालयातील वैद्यकीय देयक कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली. त्यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागील एका वर्षातील प्रलंबित वैद्यकीय देयकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. ही प्रलंबित देयके निकाली काढण्यासंदर्भात यापूर्वीही जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सप्टेंबर महिन्यात दोन आढावा बैठका घेतल्याने  १७८ वैद्यकीय देयके निकाली काढली होती.

परंतू, त्यानंतरही मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित राहीली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची प्रत्यक्ष पाहणी करुन झडती घेतली असता अजूनही दोनशेहून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचे उघडकीस आल्याने तसेच लोकसेवा हक्क कायद्यातील कालमर्यादेचे उल्लंघन केल्याने देयकाचे काम हाताळणाऱ्या संबंधित लिपिकास तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईमुळे शासकीय कामात दिरंगाई करणाऱ्या आणि लोकसेवा हक्क कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कारवाई इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news