Chain Snatching | दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली

Yavatmal Crime | आर्णी रोडवरील श्रमिक सोसायटीजवळील घटनेने खळबळ
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

Arni Road chain snatching

यवतमाळ : दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने हिसकावून पळ काढल्याची घटना येथील आर्णी रोडवरील श्रमिक सोसायटीत घडली.

लता प्रमोद बंग असे महिलेचे नाव आहे. त्या घरी जात असताना तोंडाला रुमाल बांधून असलेले दोन अज्ञात चोरटे विनानंबरच्या दुचाकीने जवळ आले. गौरकार यांचे घर कुठे आहे, असे विचारून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ९६ हजार ५०० रुपयांची १५ ग्रॅम ६० मिली वजनाची पोत हिसकावून पळ काढला.

Crime
Yavatmal Crime : कोंबडा चोरल्याच्या संशयातून तरुणाची हत्या

याप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. शहरात यापूर्वीही महिलांचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news