यवतमाळ: अपघातातील गंभीर जखमी मित्रांचा पाठोपाठ मृत्यूने हळहळ

Yavatmal Accident News | पहापळ गावात शोककळा पसरली
accident victim death in Yavatmal
प्रातिनिधिक फोटो File Photo
Published on
Updated on

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : वणीवरून मारेगावाकडे येणाऱ्या दुचाकीस्वार दोन मित्रांचा अपघात होऊन दोघेही गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, पाच दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या दोन मित्रांचे शनिवारी पहाटे नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेमुळे तालुक्यातील पहापळ या गावात शोककळा पसरली आहे.

विजय संभाजी थेरे (वय ३५), नितीन खुशाल पायघन (वय २८) अशी मृतांची नावे असून, हे दोघे मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील रहिवासी आहेत. हे दोघेही मित्र दुचाकीने (एमएच ३१ - एच ३४०) वणीवरून ७ जानेवारी रोजी मंगळवारी रात्री १० च्या सुमारास मारेगावकडे येत होते. निंबाळा गावाजवळ राज्य महामार्गांवर वन्यप्राणी अचानक आडवे आल्याने जबर धडक होऊन दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांवरही नागपूर येथे गेल्या पाच दिवसांपासून उपचार सुरू होते.

मात्र, कोमात असलेल्या या दोन तरुणांनी पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी पहाटे विजय याने अखेरचा श्वास घेतला. काही वेळातच नितीन याचाही मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. विजय थेरे याच्यामागे आई, पत्नी व सहा वर्षांची मुलगी आहे. तर नितीन पायघन हा अविवाहित होता. नितीन याच्या पश्चात आई-वडील व बहीण आहे.

accident victim death in Yavatmal
यवतमाळ : ट्रॅव्हलमधून साडेअठरा किलो चांदी लंपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news