यवतमाळ : ट्रॅव्हलमधून साडेअठरा किलो चांदी लंपास

Yavatmal Crime News | नांदेड- नागपूर प्रवासादरम्‍यान घटना
Yavatmal Crime News
File Photo
Published on
Updated on

यवतमाळ : नांदेड-नागपूर ट्रॅव्हल्सने प्रवास करीत असलेल्या प्रवाशाची ६० हजारांची रोख आणि साडेअठरा किलो चांदी अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना येथील यवतमाळ मार्गावरील तरोडा येथे मध्यरात्री उघडकीस आली.

मुकेश रमेशचंद्र सोनी (वय ४४), रा. धुळे असे प्रवाशाचे नाव आहे. अनुराग ट्रॅव्हल्सने ते जात होते. प्रवासादरम्यान मुकेश यांच्याकडे दोन बॅग होत्या. त्यात १७ किलो जुने आणि दीड किलो नवीन चांदीचे दागिने, ६० हजारांची रोख असा एकूण नऊ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल होता. आर्णी-यवतमाळ मार्गावरील तरोडा येथे हॉटेल सरकार समोर सदर बस मध्यरात्री दीड वाजताचे सुमारास थांबली.

यावेळी अज्ञात चोरट्यांनी बॅगमधून मुद्देमाल चोरी केल्याचा प्रकार प्रवाशाच्या लक्षात आला. याप्रकरणी आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. अधिक तपास ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कपिल मस्के करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news