

यवतमाळ : रस्त्याने जात असताना एका घराची भिंत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.दारव्हा तालुक्यातील चोरखोपडी गावात आज शनिवारी सकाळी ही घटना घडली.
सीता उर्फ जिजाबाई किसन आडे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्या गावालगतच्या नाल्यावर कपडे धुऊन परत येत होत्या.
दरम्यान, गावातील ज्ञानेश्वर सिताराम जवके यांच्या घरामागून जात असताना त्यांच्या घराची मातीची भिंत अचानक कोसळली. ही भिंत सीताबाई यांच्या अंगावर कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.